भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

नाशिक

ठाकरे गटाचे संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल

नाशिक,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्याविरोधात कलम 500 अन्वये संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांनी नाशिकच्या पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल केला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. त्याला उत्तर देताना संजय राऊतांची जीभ घसरली. “हे लोक काय चाटत आहेत. ही अशी चाटूगिरी महाराष्ट्रात कधीच झाली नव्हती”, असं म्हणत राऊतांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली. त्यामुळे राऊतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!