भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

रुग्ण नव्हे चक्क दारूचे खोके घेऊन सायरन वाजवत निघाली रुग्णवाहिका

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नाशिक (प्रतिनिधी)। राज्यात कोरोनाचा विस्फोट असताना जगभरातून मोठी चिंता व्यक्त केली जात आहे, कोरोना मुळे अनेकांचे संसार उघडे पडत आहे महामारीचे संकट आणखी गडद होत असताना ,कुठे अंत्यसंस्करा साठी रांगा लावाव्या लागत आहे तर कुठे बेड मिळत नाही, कुठे तर रुग्णांना हलवण्या साठी रुग्णवाहिका मिळत नसताना अद्यापही काही लोकांना पैशाच्या हव्यासपोटी त्याचे गांभीर्य नसल्याचे दिसतेय. याचेच उदाहरण संगमनेर शहरात रुग्णवाहिकेतून चक्क सायरन वाजवत देशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली .

कोरोना व्हायरस ची दुसरी लाट भीती दायक ठरत असताना डॉक्टर, पोलीस, आरोग्य कर्मचारी, प्रशासन जीव तोडून काम करीत आहेत. प्रत्येक रुग्णाला वाचवण्यासाठी यंत्रणा काम करतेय. या कोरोनाच्या संकटात रुग्णावाहिका यंत्रणेचा महत्वाचा भाग आहे. परंतु या रुग्णवाहिकेचा गैरकामासाठी वापर केला जात असल्याची घटना उघडकीस आली, कोरोनाच्या पश्वभूमीवर संगमनेर शहरात नाकाबंदी दरम्यान, रुग्णवाहिकेत रुग्ण नसतानाही एक रुग्णवाहिका सायरन वाजवत जात होती या बाबत रुग्णवाहिकेत पेशंट नसताना ही सायरन का वाजवतो अशी विचारणा पोलीसांनी केली असता याचे उत्तरं देताना चालकाची भांबेरी उडाली. चालक समाधान कारक उत्तर देऊ न शकल्याने पोलिसांना शंका आली त्यांनी रुग्णवाहिकेची तपासणी केली असता रुग्णवाहिकेत चक्क देशी दारूचे सात बॉक्स आढळून आल्याने संगमनेर पोलिसांनी याप्रकरणी दोघां आरोपीना अटक केली आहे. 

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!