भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमनाशिक

दोन दिवसात तीन लाचखोर अधिकारी ACB च्या जाळ्यात

नाशिक,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई सुरूच असून सलग दुसऱ्या दिवशी क्लास वन आणि क्लास तीन अधिकारी जाळ्यात अडकला आहे. तक्रारदाराकडून तब्बल २८ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी टाकलेल्या छाप्यात दोन दिवसात तिन लाचखोर ताब्यात घेण्यात आले आहे. 

२८ लाखांची लाच घेणारा आदिवासी विभागाचा कार्यकारी अभियंता ताब्यात
गेल्या काही दिवसांपासून नाशिकसह जिल्ह्यातील लाचेच्या प्रकरणांत वाढ झाली आहे. काल  आरोग्य विभागाच्या उपसंचालकांचे लाच घेतल्याचे प्रकरण ताजे असताना आज  आदिवासी विकासच्या  बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंताला विभागाने ताब्यात घेतले आहे.  दिनेशकुमार बागुल असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे.  गेल्या १५ दिवसांपासून एसीबी बागूलच्या मागावर होते.  सेंट्रल किचनच्या कामासाठी १२ टक्के दराने लाच मागितल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.  साधारणपणे अडीच कोटींचे काम मंजूर करण्यासाठी लाच मागितली आहे.  २८ लाखांची लाच घेणारा आदिवासी विभागाचा कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांच्या तिडके कॉलनी परिसरातील एका अलिशान अपार्टमेंटमधील घरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून छापेमारी सुरू आहे. तसेच  नाशिकसह पुणे आणि धुळ्यातील घरी एसीबी कडून छापेमारी सुरू आहे. बागुल यांच्याकडे मोठं घबाड हाती लागण्याची शक्यता आहे

दहा हजारांची लाच , नाशिकमध्ये अधिकारी अटकेत
दिंडोरी तहसील कार्यालयातील मंडल अधिकारी कमरुद्दीन गुलाम अहमद सय्यदला १० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. तक्रारदाराच्या शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांचे मावशीचे नाव समाविष्ट करण्याकरता लाच मागितली होती. 

आरोग्य विभागाचा क्लास वनचा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
 नाशिकच्या आरोग्य विभागाच्या उपसंचालक कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. गजानन मारोतराव लांजेवार असे लाज घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. लांजेराव हे नाशिकच्या उपसंचालक आरोग्यसेवा या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांनी तक्रारदार यांचे सेवानिवृत्तीनंतरचे रजा रोखीकरणाचे बिल मंजूर करण्यासाठी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यांना २० हजारांची लाच स्विकारतांना पकडण्यात आले.  गजानन लांजेवार यांनी सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी असलेले तक्रारदार यांच्याकडे सेवा निवृत्ती नंतरचे रजा रोखीकरणाचे बिल मंजूर करण्यासाठी वीस हजार रुपयांचे लाच मागितली होती.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!