नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी तिघांचा उमेदवारी अर्ज दाखल
नाशिक,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पाचव्या दिवशी तीन उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या जाहीर झालेल्या निवडणुकीसाठी ४६ उमेदवारांनी ९७ उमेदवारी अर्ज नेले असून, आज तीन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे सादर केले. आज अंगारकी संकष्ट चतुर्थी योग असल्याने अनेक उमेदवार अर्ज दाखल करतील,. असा अंदाज असल्याने प्रशासनाने पूर्ण तयारी केली होती; मात्र अवघ्या तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
यामध्ये जुबेर नासिर शेख (धुळे) अपक्ष, शुभांगी भास्कर पाटील (धुळे) अपक्ष, सोमनाथ नाना गायकवाड (नाशिक) अपक्ष आदींचा समावेश आहे. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी रमेश काळे, उपायुक्त उन्मेष महाजन, तहसीलदार, तीन नायब तहसीलदार व लेखा अधिकारी उपस्थिती होते.