भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

वीज पडून दोन जण व 1 बैल जागीच ठार, 1 महिला जखमी !

Monday To Monday NewsNetwork।

नाशिक (प्रतिनिधी)। अवकाळी पाऊस पडत असताना रस्त्याच्या कडेला झाडाखाली आडोशाला उभ्या असलेल्या तिघा जणांवर काल संध्याकाळी अचानक वीज पडल्याने यातील दोन जण जागीच ठार झाले असून यातील एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तर वीज पडून बैल ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली .

या बाबत अधिक माहिती अशी की, येवला तालुक्यात बेमोसमी पावसाला सुरुवात झाली असून येवला-मनमाड राज्य महामार्गावरून एम एच 15 जी के 7986 व एम 41 ए व्ही 1078 या दोन मोटारसायकल ने जात असताना पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास अचानक बे मोसमी पावसाला सुरुवात झाल्याने झाडाच्या आडोशाला उभे राहिले असता अचानकपणे वीज पडल्याने दोन जणांचा जागेवरच मृत्यू झाला तर एका गाडीवरील महिला जखमी झाली आहे.मयत रमेश संजय गाढे ,वय 45, रा.गिरणारे ता.देवळा, मयत हरपालसिंग बच्चनसिंग शिख ,वय 30, रा.मनमाड, सुखमीत हरपालसिंग शिख ,वय 25, रा.मनमाड, ही महिला जखमी झाली असून तिच्यावर सावरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रमेश गाढे हे अनकाईचे जावई आहेत ते अनकाई येथे जात होते तर शिख हे दोघे पती, पत्नी कोपरगाव येथे जात होते. त्यांचा विवाह अलीकडेच झाला होता. वादळी वार्‍यासह पाऊस आणि वीजांचा कडकडाट होत असल्याने ते आडोशाला थांबले होते. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. तसेच रमेश संजय गाढे आपल्या घरी असलेल्या रुग्णांसाठी औषध घेण्यासाठी आले असता त्यांच्यावर काळाने घाला घातला. या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. येवला तालुक्यातील सिताराम तुकाराम गायकवाड यांचा बैल बळी पडून मृत्युमुखी झाल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. या बेमोसमी पावसाने शेतकर्‍यांच्या कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!