भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमनाशिक

‘मी आर्मीतून बोलत आहे’ असे सांगत दोन इसमांकडून २ लाख ६२ हजाराची फसवणूक

मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।

नाशिक, प्रतिनिधी : येथे ऑनलाइन फसवणुकीचे एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. फोनवरती ‘मी आर्मीमधून बोलत असल्याची’ बतावणी करून गाडी खरेदी करून देण्याचा बहाण्याने दोन इसमानी गुगल पे, तसेच यूपीआय वॉलेट खात्यावर तब्बल २ लाख ६२ हजार १९७ रुपये भरण्यास सांगून फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत सायबर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रेणूकुमार नांवाच्या इसमाने आपल्या साथीदारांसह फोनवरून “मी आर्मीतून बोलत आहे,” असे सांगत आपणांस गाडी खरेदी करून देतो म्हटत दिंडोरी रोड, म्हसरूळ येथील रहिवासी संकेत अतुल ठोंबरे (वय-२९) यांचा विश्‍वास संपादन केला. त्यानंतर दोघा भामट्यांनी गाडी खरेदी करण्यासाठी ठोंबरे यांना आयडीएफसी फर्स्ट बँक खाते क्रमांक १०७०८२०८९०  व विकास पटेल या नावाने असलेल्या गुगल पे वॉलेट क्रमांक ९५२२१९४३५९ व मोबाईल क्रमांक ९६४९१६५९७३  या क्रमांकावर २ लाख ६२ हजार १९७ रुपये भरायला लावून त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ४२० सह माहिती-तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (क) (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी अधिक तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!