महिलेची छेड काढल्याच्या कारणावरून तरुणाची हत्या
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नाशिक (प्रतिनिधी)। नाशिक पुन्हा खुनाच्या घटनेने हादरले आहे. येथील सिडको परिसरातील संभाजी स्टेडीयम येथे शुक्रवारी दुपारी एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे, ही हत्या महिलेची छेड काढल्याच्या कारणावरून झाल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, सिडको परिसरातील संभाजी स्टेडीयम येथे शुक्रवारी दुपारच्या सुमारास योगेश तांदळे (वय 30) या तरुणाची हत्या करण्यात आली असून ही हत्या महिलेची छेड काढल्याच्या कारणावरून झाल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. योगेशने एका महिलेची छेड काढली होती. याचा राग येऊन मोटरसायकलवर आलेल्या दोघांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. हा हल्ला छेडछाडीतून झाल्याचे समजते. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.