Video।ऑक्सिजनचा पुरवठा विस्कळीत झाल्याने हार्ट पंप करत जीव वाचवण्यासाठी धडपड !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
कधी तरी देवा तू देवा सारखे वाग…!
नाशिक (निशाद साळवे)। ऑक्सिजन टॅंक गळतीमुळे रूग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रूग्णांचे ऑक्सिजन अभावी भयंकर हाल. ऑक्सिजनचा पुरवठा विस्कळीत झाल्याने हार्ट पंप करण्याचा प्रयत्न हॉस्पिटल कर्मचारी आणि रूग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे. महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात नव्या ऑक्सिजन टाकीला गळती लागल्याने अनेक रुग्णांना आॅक्सिजनचा पुरवठा बंद झाला. त्यामुळे रुग्णांना तातडीने हलविण्यात आले. पण श्वासासाठी आॅक्सिजन न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू झाला. धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली.