भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

नाशिकशैक्षणिक

” या ” कार्यश्रेत्रातील शाळा 10 तारखेपर्यंत बंदच राहतील

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नाशिक ,मंडे टू मंडे वृत्तसेवा। कोरोनामुळे ओस पडलेल्या शाळा दीर्घ काळानंतर पुन्हा दि. 1 डिसेंबरपासून सुरू होणार असतानाच नव्यानेच आलेल्या ओमीक्रॉन व्हेरिंएटच्या पार्श्‍वभूमीवर मनपा प्रशासनाने शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय पुन्हा दि. 10 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलला आहे. मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्या सुचनेनुसार तसे पत्र महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी सुनीला धनगर यांनी शहरातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पाठविले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव आता बर्‍याच अंशी कमी झाल्याने टप्प्या टप्प्याने राज्य शासनाने केंद्र शासनाच्या मार्गनदर्शक सुचनांनुसार सर्व काही खुले केले आहे. माध्यमिकचे इयत्ता आठवीपासूनचे वर्गही सुरू झाले असून, महाविद्यालयेही खुली झाली आहेत. प्राथमिक शाळांना मात्र हिरवा बावटा दाखविला गेलेला नव्हता; मात्र शासनाने दि. 1 डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरू करण्यास अनुमती दिली होती, त्यानुसार सारी तयारीही पूर्ण होऊन शाळेची घंटा वाजणार असतानाचा नव्यानेच आलेल्या ओमीक्रॉन व्हेरिंयटमुळे मनपा प्रशासनाने सावधगिरीचा उपाय म्हणून शाळा सुरू करण्याचा निर्णय दि. 10 तारखेपर्यंत पुढे ढकलला आहे. मनपा आयुक्त आणि शिक्षण उपसंचालक नाशिक यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर नाशिक मनपा क्षेत्रातील इयत्ता 1 ते 7 वी पर्यंतच्या सर्व शाळांचे वर्ग सुरू करण्याबाबतचा निर्णय दि. 10 डिसेंबरपर्यंत पुढे ढकललला आहे. इयत्ता 8 वी पासूनचे वर्ग मात्र पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!