खुटवतनगरमध्ये योगदिनानिमित्ताने मोफत मल्टीव्हिटॅमिन गोळ्यांचे वाटप
Monday To Monday NewsNetwork।
नाशिक सिडको(प्रतिनिधी)।आंतराष्ट्रीय योग दीना निमित्ताने श्री रामकृष्ण आरोग्य संथान, विवेकानंद रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील 1000 कुटूंबाना कोरोनापासून बचावासाठी मल्टीव्हिटॅमिन गोळ्यांचे व मास्क तसेच सॅनिटायझर चे देखील वाटप करण्यात आले. तसेच फाऊंडेशन च्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी व प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मल्टीव्हिटॅमिन गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले उपस्थित प्रसाद ठाकरे,जितेंद्र पाटील,तन्मय गांगुर्डे/पाटील,जॅकी ठाकरे, गोपाळ शिरोडे,प्रतीक बैरागी,किशन बैरागी,शरद पाटील व नागरिक उपस्थित होते. प्रस्थाविक तन्मय गांगुर्डे यांनी केले.
निरोगी तन आणि शांत मन याची गुरुकिल्ली म्हणजे योग
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मधे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस’आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणुन साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडला. त्यानुसार २१ जून २०१५ हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणुन जगभर साजरा होत आहे.
समाजामधे योग विषयी जागरुत्ता वाढावी आणि योगाचे महत्व लोकांना पटावे यासाठी दरवर्षी २१ जून रोजी संपुर्ण जगामधे योग दिवस साजरा केला जातो संपुर्ण जगामधे योगाचे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात तसेच योग आणि योग केल्याने आपल्याला होणारे फायदे या विषयी माहिती देण्यासाठी डिजिपी नगर मध्ये कार्यक्रम आयोजित आला. कार्यक्रमाचे नियोजन प्रसाद ठाकरे, जितेंद्र पाटील, तन्मय गांगुर्डे पाटील यांनी केले उपस्थित सर्व डिजिपी नगर नागरिक हजर होते.