भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

नाशिक

नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर, ‘ या’ दिवशी पहिले “शाही स्नान”

नाशिक, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सिंहस्थ कुंभमेळा २०२६ च्या तयारीला सुरुवात झाली असून या वेळचा सिंहस्थ कुंभमेळा २२ महिन्यांचा राहणार आहे .यामध्ये ३ मुख्य शाही स्नान आणि ४२ पर्व शाही स्नानांचा समावेश असणार आहेत. अमृतस्नान जुलै २०२६ ते सप्टेंबर २०२८ कालावधीत पार पडतील.

३१ ऑक्टोबर २०२६ रोजी कुंभमेळ्याचे ध्वजारोहण होणार आहे. हा भव्य धार्मिक सोहळा  तब्बल १८ महिन्याऐवजी २२ महिन्यांचा राहणार आहे. ३१ ऑक्टोबर ते जुलै दरम्यान नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे संपन्न होणार आहे.

आज रविवार १ जून रोजी कुंभमेळ्याच्या शाही स्नान आणि पर्व स्नानाच्या तारखांची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित करण्यात आली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १३ आखाड्याचे महंत यांच्या उपस्थितीत कुंभमेळाच्या नियोजन संदर्भात महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत कुंभमेळाच्या नाशिक आणि त्रंबकेश्वरच्या अमृत स्नानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री यांच्या समवेत साधू महंत उपस्थित होते

नाशिक मध्ये हा भव्य कुंभमेळा अधिक दीर्घकालीन आणि नियोजित स्वरूपात पार पडणार आहे. ३१ ऑक्टोबर २०२६ पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे. २४ जुलै २०२८ रोजी कुंभमेळाचा शेवटचा दिवस असणार आहे. या कुंभमेळ्यात ४२ पर्वस्नान राहणार आहे.

  • ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी कुंभमेळाचे रामकुंडावर ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर कुंभमेळा पर्वाला प्रारंभ
  • २४ जुलै २०२८ पर्यंत कुंभमेळा सुरू राहील.
  • या कालावधीत एकूण ४२ पर्व स्नान असणार आहेत.
  • २४ जुलै २०२७ रोजी आषाढ कृष्ण पंचमीच्या दिवशी आखाडाचे ध्वजारोहण होणार आहे.
  • २९ जुलै २०२७ रोजी एकादशीच्या दिवशी नगर प्रदक्षिणा होईल.

अमृतस्नानाच्या तारखा

  • २ ऑगस्ट २०२७ सोमवती अमावस्याच्या दिवशी पहिले अमृत स्नान होणार आहे.
  • ३१ ऑगस्ट २०२७ श्रावण वद्य अमावस्या ला महाकुंभस्नान होणार आहे.
  • ११ सप्टेंबर २०२७ ला भाद्रपद शुद्ध एकादशीच्या अमृत स्नान होणार आहे.
  • मुख्य पर्वकाळ असणाऱ्या ३१ ऑगस्ट २०२७ च्या दिवशी सूर्य चंद्र गुरू सिंह राशीत आहेत, त्यामुळे या दिवशी महाकुंभ स्नान केले जाणार आहे.
  • यंदाचा कुंभमेळा त्रिखंडी कुंभमेळा आहे, यात गुरू हा वक्री होऊन सिंह राशीतून कर्क आणि कन्या राशीत प्रवेश करतो.
  • यंदाचा कुंभमेळा वक्री आहे, म्हणजेच गुरूचे भ्रमण इतर राशीमध्ये होणार आहे. कोणत्या दिवशी गुरू कोणत्या राशीत प्रवेश करणार याची माहिती.
  • ३१ ऑक्टोबर २०२६ गुरू सिंह राशीत प्रवेश
  • २४ जानेवारी २०२७ वक्री होऊन गुरू कर्क राशीत प्रवेश
  • २५:जून २०२७ गुरू सिंह राशीत प्रवेश
  • २६ नोव्हेंबर २०२७ गुरू कन्या राशीत प्रवेश
  • २८ फेब्रुवारी २०२८ गुरू सिंह राशीत प्रवेश
  • २४ जुलै २०२८ गुरू कन्या राशीत प्रवेश करत आहे.

३१ ऑक्टोबर २०२६ ला कुंभमेळाचे ध्वजारोहण असल्याने सिंहस्थ कुंभमेळाच्या दुसऱ्या खंडात कुंभमेळ्याच्या शाही पर्वणी सुरु होऊन कुंभमेळा पर्वाचा शेवटचा दिवस हा २४ जुलै २०२८ रोजी हा राहणार आहे.

श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघ, नाशिक
अखिल भारतीय वैष्णव आखाडा परिषद सिंहस्थ कुंभमेळा नाशिक २०२६-२७-२८ –

  • सिंहस्थ ध्वजारोहण शुभारंभ
    ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी
    ठिकाण – रामकुंड, पंचवटी
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!