सव्वा लाख रुपयांच्या लाच प्रकरणी तलाठी एसीबी च्या जाळ्यात
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नाशिक (निशाद साळवे): आगर टाकळी येथील तलाठ्याने मिळकतीचे स्वतंत्र सनद, ७/१२ उतारा व ६ ड उतारा देण्यासाठी १ लाख २५ हजार रुपयांच्या लाच मागितल्या प्रकरणी एसीबी च्या जाळ्यात सापडल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली अधिक माहिती अशी, की आगर टाकळी येथील तलाठी संजय किशोर घोळवे यांनी तक्रारदाराकडे मिळकतीचे स्वतंत्र सनद, ७/१२ उतारा व ६ ड उतारा देण्यासाठी तडजोडीअंती ५० हजार व ७५ हजार अशा दोन टप्प्यांमध्ये १ लाख २५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. लाच मागितल्याचे पडताळणीमध्ये स्पष्ट झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तलाठी घोळवे यांच्या विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा करण्यात आला आहे.