भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमनाशिक

प्रांताधिकाऱ्यांनी केली महिला तलाठ्याकडे शरीरसुखाची मागणी

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नाशिक,मंडे टू मंडे वृत्तसेवा। महिला तलाठ्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार असलेल्या येवला प्रांताधिकारीला कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. त्यामुळे या प्रकरणी अडचणी वाढणार आहेत. जिल्हा प्रशासनाने संबंधित प्रांताधिकाऱ्याकडून खुलासा मागविला आहे.

महसूल विभागात एकच खळबळ उडाली होती
येथील प्रांताधिकारीने शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप महिला तलाठ्याने केला होता. गुन्हा दाखल झाल्याने महसूल विभागात एकच खळबळ उडाली होती. प्रांताधिकारी सोपान कासार यांच्यावर एका महिला तलाठ्याच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात विनयभंग तसेच, दमदाटी करण्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. बदलीस पात्र नसतानाही ज्येष्ठतेचे नियम डावलून नांदगाव तालुक्यात बदली केली यांसह विनयभंगाचे त्यांच्यावर आरोप करून बदलीविरोधात पीडित महिला तलाठ्याने मॅटमध्ये धाव घेतली होती. २३ ऑगस्टपर्यंत मॅटने स्थगिती दिली. दरम्यान, त्या महिलेने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडेही तक्रार केली होती. येवला पोलिस ठाण्यात याप्रकरणी विनयभंगाची तक्रार दिली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी मांढरे यांनी विशाखा समितीकडून याविषयी अहवाल मागविला. त्यानंतर विशाखा समितीच्या अहवालानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावून खुलासा मागविला आहे.

महिला तलाठ्याकडे शरीर सुखाची मागणी; कारणे दाखवा नोटीस
महिला तलाठ्याकडे शरीर सुखाची मागणी केल्याची तक्रार असलेल्या येवला प्रांताधिकारी सोपान कासार यांना जिल्हा प्रशासनाने कारवाई का करू नये, अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. त्यामुळे कासार यांच्यापुढील अडचणी वाढणार आहेत. प्रातांधिकारी कासार यांच्याविरोधात महिला तलाठ्यांनी केलेल्या तक्रारीत विशाखा समितीने ठपका ठेवला असून, त्यांच्यावर कारवाईसाठी समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कासार यांच्याकडून खुलासा मागविला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!