भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमनाशिक

सेवानिवृत्त महिला सहकाऱ्याकडून लाच घेताना PWD चे दोन क्लार्क ACB च्या जाळ्यात

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नाशिक, मंडे टू मंडे वृत्तसेवा : आपल्याच कार्यालयातून निवृत्त झालेल्या महिला सहकाऱ्याकडून लाच घेताना नाशिकमधील दोन लिपिकांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. निवृत्तीनंतर पेन्शन आणि इतर औपचारिकता पूर्ण करण्याच्या कामासाठी आपल्याच सहकाऱ्याकडून या दोघांनी लाच मागितली होती. या प्रकाराने धक्का बसलेल्या निवृत्त कर्मचाऱ्याने त्यांना धडा शिकवायचं ठरवलं. महिला कर्मचाऱ्याने तक्राल दाखल केल्यानंतर सापळा रचून सार्वजनिक बांधकाम विभाग, उत्तर विभाग कार्यालय, नाशिक येथील मुख्य लिपीक प्रवीण नामदेव पिंगळे आणि वरिष्ठ लिपीक लता शांताराम लहाने या दोघांना अटक करण्यात आली.

सरकारी कार्यालयांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराचं प्रमाण कमी झालं नसल्याचंच यातून दिसून येत आहे. ज्या कार्यालयात कर्मचाऱ्याची हयात गेली, त्याच कार्यालयात त्याला लाच मागितली जात असेल, तर सर्वसामान्यांचं काय होत असेल, अशी चर्चा नाशिककरांमध्ये रंगली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला त्यांचे सेवापुस्तक पडताळणी, रजेतील फरकांचे बिल यासह अन्य कामं करायची होती. त्यासाठी निवृत्त झाल्यानंतर ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात सतत खेटे घालत होते. मात्र त्यांचं काम काही पुढे सरकत नव्हतं. कुठलं ना कुठलं कारण सांगून त्यांचं काम टाळलं जात होतं. त्यानंतर हे काम करण्यासाठी कार्यालयातील मुख्य लिपिक आणि वरीष्ठ लिपिक यांनी त्यांच्याकडे 10 हजार रुपयांची लाच मागितली.

या प्रकारानंतर निवृत्त कर्मचाऱ्याने एसीबीकडे तक्रार दाखल केली. एसीबीने सापळा रचला आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील हालचालींवर लक्ष ठेवलं. निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांनी पैसे घेऊन कार्यालयात जायला सांगितलं. लाच स्विकारत असतानाच मुख्य लिपिक प्रवीण नामदेव पिंगळे आणि वरिष्ठ लिपिक लता शांताराम लहाने (बोडके) यांना अटक करण्यात आली. नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उत्तर विभाग कार्यकारी अभियंता कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. लाचलुचपत विभागाकडून या प्रकरणाची अधिक चौकशी केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!