भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमनाशिक

Breaking | ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाकडून लाच स्वीकारताना दोन पोलीस एसीबीच्या जाळ्यात !

Monday To Monday NewsNetwork|

नाशिक, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी : ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाकडून विरुद्ध दिशेने वाहनास जाण्याची मुभा देऊन त्या बदल्यात १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोन पोलीस नाईकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

तक्रारदार यांचा ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय असून, त्यांचा ट्रेलर हा मुंबईच्या दिशेकडून इगतपुरीच्या दिशेने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरून जात असताना या ट्रेलरला कसारा येथील घाटातून इगतपुरीकडे विरुद्ध दिशेने जाण्याची मुभा देऊन हा घाट ओलांडून, तसेच पार करून देण्याच्या मोबदल्यात महामार्ग पोलीस केंद्र, घोटी येथिल कैलास रामदास गोरे, संतोष उत्तम माळोदे हे दोघा पोलीस कर्मचाऱ्यांनी पंचांसमक्ष 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली,

तसेच हा घाट पार करून महामार्ग पोलीस केंद्र, घोटी (ता. इगतपुरी) येथे आल्यावर आरोपी संतोष माळोदे यांनी तडजोडीअंती 15 हजार रुपये लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारण्याचे मान्य केले. लाचखोर दोघा जणांविरुद्ध इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील कारवाई पोलीस अधीक्षिका शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, वाचक, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या निरीक्षक गायत्री जाधव व पथकाने केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!