भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमनाशिक

३ लाखांची लाच : एलसीबी उपनिरीक्षकासह पंटर एसीबीच्या जाळ्यात

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नाशिक, मंडे टू मंडे वृत्तसेवा : आयपीएल क्रिकेट मॅचचे बेटिंग प्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक व एका खासगी पंटरला ३ लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली असून सदरील घटनेत बडा अधिकारीच जाळयात अडकल्याने पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या आयपीएल मॅच सुरू आहेत. देवळाली कॅम्प येथील एका फ्लॅटवर आयपीएल क्रिकेट मॅचचे बेटिंग सुरू असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. हे बेकायदेशीर असून याप्रकरणी गुन्हा दाखल होऊ नये म्हणून नाशिक ग्रामीण मधील स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक महेश वामनराव शिंदे यांनी तक्रारदारकडे २५ सप्टेंबर रोजी चार लाख रुपयांची लाचेची मागणी केली. त्यात तडजोडीअंती ३ लाख देण्याचे ठरले मात्र, तक्रारदाराने याप्रकरणी एसीबीकडे तक्रारदार केल्याने सापळा रचून तक्रारदाराने पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांच्या ओळखीचा खाजगी इसम संजय आझाद खराडे (वय ४५) यांना आज ३ लाख रुपये लाच देत असतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे त्यांना रंगेहात ताब्यात घेतले. सदरील इसमाने ही रक्कम स्थानिक गुन्हे शाखा पोलिस उपनिरीक्षक महेश शिंदे यांच्या सांगण्यावरून स्वीकारल्याचे सांगितले असून उपनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

यांनी केली कारवाई– ही कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक सतीश भामरे, उपधीक्षक अभिषेक पाटील, पोलिस निरीक्षक मीरा आदमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ, पोलीस हवालदार प्रफुल्ल माळी, नितिन कराड, प्रभाकर गवळी, प्रवीण महाजन, शिरीष अमृतकर, चालक संतोष गांगुर्डे यांनी सापळा रचून खराडे यास ताब्यात घेतले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!