भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

गणेश विर्सजनाला गालबोट; ४ जण पाण्यात बुडाले !

नाशिक (प्रतिनिधी)। नाशकात गणेश विर्सजनाला गालबोट लागल असून जिल्ह्यात एकूण चार जण पाण्यात बुडाले असल्याची घटना घडली आहे. यापैकी काही जणांचा मृतदेह सापडला आहे, तर काहींचा प्रशासनाकडून शोध घेतला जात आहे.

जिल्ह्यातील अनेक धरणातून विसर्गाला सुरुवात झाल्याने नदी नाले ओसंडून वाहत आहेत. अशातच नाशिक शहरात दुपारी आपल्या मामासोबत गणपती विसर्जनासाठी वालदेवी नदीपात्रात गेलेल्या अजिंक्य गायधनीला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला असून नाशिकरोड पोलिस ठाण्याचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान त्याचा शोध घेत आहेत. दुसरीकडे दारणा नदीत बुडून नरेश कोळी याचा मृत्यू झाला असून उपनगर पोलिस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पिंपळगाव बसवंतमधील काजवा नदीपात्रात एकाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या रवींद्र मोरे या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा दुपारी 4 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला असून पट्टीचा पोहणारा अशी त्याची ओळख होती. मोरे यांच्या अचानक जाण्याने कुटुंबासह परिवारावर शोककळा पसरलीय.

देवळा तालुक्यातील वाखारी गावात विसर्जनासाठी गेलेल्या एका लष्करी जवानाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याने गावावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. प्रशांत गुंजाळ हा जवान दोन महिन्याच्या सुट्टीवर आपल्या गावी नुकताच आलेला होता, काल दुपारच्या सुमारास आपल्या घराजवळील शेतात तो गणेश विसर्जनासाठी गेला असता विसर्जन करते वेळी तोल जाऊन विहिरीत पडल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाला असून ही घटना समजताच गावकरी मोठ्या संख्येने जमा झाले होते. विहिरीत पाणी जास्त असल्याने शोधकार्यात अडचणी येत होत्या.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!