भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमनाशिक

वैशाली झनकर लाच प्रकरणाचा फटका, हजारो शिक्षकांचं वेतन रखडलं, नेमकं प्रकरण काय?

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नाशिक, मंडे टू मंडे वृत्तसेवा। नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर या आठ लाख रुपयांच्या लाच प्रकरणात अटकेत आहे. शिक्षणाधिकाऱ्यांना अटक झाल्यानं शिक्षकांना मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील हजारहून अधिक शिक्षकांचा पगार यामुळं रखडला आहे. पगार रखडल्यानं शिक्षकांना असंख्य अडचणींना सामोरं जावं लागत आहे.

शिक्षणाधिकाऱ्यांच्या अटकेचा फटका शिक्षकांना
वैशाली झनकर यांना 8 लाख रुपयांच्या लाच प्रकरणात 13 ऑगस्टला अटक करण्यात आली होती. या प्रकरणामुळे नाशिकसह राज्यात मोठ्या प्रमाणात खळबळ माजली होती. आता या प्रकरणाचा फटका हजारो शिक्षकांना बसलाय. हजाराहून अधिक शिक्षकांचे वेतन रखडले आहे. वैशाली झनकर यांच्याकडील कारभार पाहण्यासाठी अन्य अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्यानं शिक्षकांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत.

शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावा, पालकमंत्र्याचे आदेश
नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांना शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्यास सांगितलं आहे. शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न अगोदर मार्गी लावा, त्यानंतर अधिकारी नियुक्त करा, असे निर्देश छगन भुजबळ यांनी दिले आहेत. तब्बल 8 लाख रुपयांच्या लाच प्रकरणी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली वीर झनकर अटकेत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
शिक्षक संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या 20 टक्के अनुदानातून नियमित वेतन करण्याचे आदेश देण्याच्या मोबदल्यात शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांनी 8 लाख रुपयांची लाच मागितली होती. शासकीय वाहन चालकाच्या माध्यामातून ही लाच स्वीकारताना नाशिक जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. शिक्षण विभागातील मोठ्या पदावरील अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्यानंतर जिल्हा परिषदेत चर्चेला उधाण आलंय. झनकर यांच्यासह यात वाहन चालक आणि एका प्राथमिक शिक्षकाचा सहभाग आहे.
अनुदानाला मंजुरीसाठी संस्थेकडे 9 लाखांची मागणी, 8 लाखावर तडजोड
आरोपी शिक्षणाधिकाऱ्यांनी एका संस्था चालकांकडे सरकारकडून मिळणारं 20 टक्के अनुदान मंजूर करण्यासाठी ही लाच मागितली होती. संस्था मंजूर झालेल्या अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरु करण्याच्या ऑर्डरची मागणी करत होती. ही ऑर्डर करण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी संस्थेकडून सुमारे 9 लाख रुपयांची लाच मागितली. यावेळी तक्रारदारांनी तडजोडीअंती 8 लाख रुपये देण्याचे कबूल केले. मंगळवारी (10 ऑगस्ट) सायंकाळी साडेपाचला ठाणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!