भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

विकासाची दूरदृष्टी असलेले नेते नाथाभाऊ… (लेख)

मुक्ताईनगर- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांचा आज दिनांक २ सप्टेंबर रोजी जन्मदिवस यानिमित्त राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे स्वीय सहाय्यक पांडुरंग नाफडे यांनी आपल्या भावना विशेष लेखातून मांडल्या आहेत… वाचा हा विशेष लेख.

माजी महसूल कृषी मंत्री मा.एकनाथरावजी खडसे हे दूरदृष्टी असेलेले नेतृत्व आहे शासनाद्वारे थेट मिळणाऱ्या विकासासाठी निधी व्यतिरिक्त दूरदृष्टीने विचार करून विविध मार्गातून विकास घडवून आणण्यात त्यांचा हातखंड आहे.आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात जिल्ह्यात विविध शासकीय शैक्षणिक व संशोधन संस्था स्थापन करून त्याद्वारे त्यांनी जिल्ह्यात विकास व समृद्धी धडवून आणली आहे.
     
युती शासनाच्या काळात मंत्री असतांना एकनाथरावजी खडसे यांनी प्रत्येक तालुक्यात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला यातून जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाची स्थापना करण्यात आली.तसेच खडसे यांच्या प्रयत्नातून जळगाव येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली.याद्वारे जिल्ह्यात अनेक तंत्रज्ञ व कुशल कारागीर निर्माण झाले यातील बहुतांशी लोकांना रेल्वे,आयुध निर्माणी,शासकीय तसेच खाजगी प्रकल्पात रोजगार उपलब्ध झाला.

कृषिमंत्री असतांना जिल्ह्यात कृषिक्रांती व्हावी व शेतकरी बांधवांना शेती क्षेत्रातील नाव नवीन संशोधनाची माहिती व्हावी यासाठी जिल्ह्यात शासकीय कृषी महाविद्यालय मंजूर करून आणले.त्यासाठी मुक्ताईनगर येथे विना मोबदला १०० एकर जमीन शासनाला उपलब्ध करून दिली.याद्वारे मुक्ताईनगर येथे शासकीय कृषी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. या महाविद्यालयाला ३ वर्ष पूर्ण झाली आहेत त्याचा फायदा परिसरातील शेतकरी बांधवांना होत आहे. आज जिल्ह्यातील प्रमुख पिक असलेल्या कपाशी पिकावर गुलाबी बोंड अळी पडत आहे तेव्हा मुक्ताईनगर तालुक्यात या महाविद्यालयातील शिक्षक व विध्यार्थी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या मदतीने कपाशीवरील बोंड अळी रोखण्यासाठीच्या उपाययोजना बाबत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे.भविष्यात या शासकीय कृषी महाविद्यालयाद्वारे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना शेतीतील नवीन प्रयोग, संशोधनाची माहिती व मार्गदर्शन मिळण्यास मदत होणार आहे.

एकनाथराव खडसे हे मंत्रीपदी असतांना त्यांच्याकडे असलेल्या अल्पसंख्याक विकास या खात्याच्या माध्यमातून त्यांनी जळगाव जिल्ह्यात राज्यातील पहिले शासकीय अल्पसंख्याक तंत्रनिकेतन मंजूर केले होते त्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे लवकरच ते सुरू होईल अल्पसंख्यांक समुदायासाठी राखीव असणारे हे राज्यातील पहिले शासकीय तंत्रनिकेतन आहे.या तंत्रनिकेतनाद्वारे अल्पसख्यांक समुदायातून कुशल तंत्रज्ञ निर्माण होण्यास मदत होणार आहे तसेच शिक्षणाच्या प्रवाहातून दूर असलेला अल्पसंख्यांक समुदाय शैक्षणिक प्रवाहात येईल. अश्याप्रकारे आपल्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात जिल्ह्याचा शैक्षणिक क्षेत्रातून सर्वांगीण विकास व्हावा यासाठी एकनाथराव खडसे प्रयत्नरत होते.व आहेत त्यासाठी त्यांनी या व्यतिरिक्त युती शासनाच्या काळात मंत्री असतांना अथक प्रयत्नातून वरणगाव येथे जमीन उपलब्ध करून दिली होती.

तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व.गोपीनाथरावजी मुंडे याच्या हस्ते १९९९ मध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन सुद्धा झाले होते नंतर डिसेंबर २०१५ मध्ये मुक्ताईनगर येथे आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूत गिरणीच्या उद्घाटन प्रसंगी मा.मुख्यमंत्री देवेन्द्र्जी फडणवीस यांनी या केंद्रासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सुद्धा दिले होते नंतर टेंडर प्रक्रियेत असलेले हे काम अचानक रद्द  झाले. जर हे पोलीस प्रशिक्षण केंद झाले असते तर वरणगावची एक वेगळी ओळख निर्माण झाली असती यातून स्थानिकांनी विविध मार्गातून रोजगार उपलब्ध झाला असता.

जळगाव जिल्हा हा केळी उत्पादक जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे जळगाव जिल्ह्यातील केळी ही संपूर्ण भारतात देशासह आजूबाजूच्या पाकिस्तान,श्रीलंका ई. देशात निर्यात होते. परंतु निसर्गाचे लहरीपणा ऊन,वारा, पाऊस,वादळ या सारख्या नैसर्गिक संकटातून केळी पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे.त्यामुळे निर्यातक्षम केळी उत्पादित होत नाही.शेतकरी बांधवांच्या केळीची टिश्यू ची रोपे विकत घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होतो. या सर्व बाबी हेरून एकनाथरावजी खडसे हे कृषिमंत्री असतांना त्यांनी हिंगोणे ता.यावल येथे राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत केळी गुणवत्ता व उती संशोधन केंद्र उभारणी साठी मंजुरी मिळवून आणली होती त्यासाठी हिंगोणे येथे २० एकर जागा अधिग्रहित करण्यात आली होती.

जर हे केंद्र निर्माण झाले असते तरे केळी पिकावर संशोधन होवून टिश्यू कल्चरच्या माध्यमातून दर्जेदार व रोगमुक्त निर्यातक्षम केळी उत्पादित होण्यासाठी शेतकरी वर्गाला मार्गदर्शन मिळाले असते त्याच बरोबर केळीच्या टिश्यूची रोपे सवलतीच्या दरात निम्म्या किमतीत उपलब्ध झाले असते.याच बरोबर एकनाथराव खडसे यांनी पाल ता.रावेर येथे शासकीय उद्यानविद्या महाविद्यालय मंजूर करून आणले होते त्यासाठी पाल येथे १०० एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली होती.या महाविद्यालयाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना फुलशेती विषयी माहिती मिळाली असती त्यातून जिल्ह्यातून शेतकरी गुलाब,जरबेरा यासारख्या पैसा मिळवून देणाऱ्या फुल शेती कडे वळले असते.

शेती मध्ये आजकाल मजुरांची वणवा भासते त्यामुळे शेतीचे आजकाल आधुनीकीकरण व यांत्रिकीकरण होत आहे ही बाब लक्षात घेवून एकनाथराव खडसे यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून जळगाव जिल्ह्यात कृषी अवजार व संशोधन केंद्र मंजूर करून आणले होते. त्यासाठी सालबर्डी ता.मुक्ताईनगर येथे जमीन उपलब्ध करून दिली होती या केंद्रात नवनवीन शेती अवजारांची निर्मिती व संशोधन केले जाणार होते व ते शेतकरी बांधवांना सवलतीच्या दरात तसेच भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्यात येणार होते यातून रोजगार निर्मिती होणार होती.त्याद्वारे शेतकरी वर्गाला शेतीतील नवीन तंत्रज्ञान यंत्र सामुग्री उपलब्ध होणार होती.

याचबरोबर एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नाने केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी आमदगाव ता.बोदवड येथे उद संशोधन केंद्रास मंजुरी दिली होती.तसेच जळगाव जिल्ह्यात भुसावळ जामनेर रोडवर आय.टी.आय. भुसावळ जवळ  कुक्कुटपालन संशोधन प्रकल्प मंजूर करून आणला होता.परंतु दुर्दैवाने एकनाथराव खडसे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देताच शैक्षणिक संशोधनातून समृद्धी आणणारे हे प्रकल्प जळगाव जिल्ह्यामधून इतरत्र जिल्ह्यात हलविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.याचा ब बरोबर जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यात लिंबू पिकाचे उत्पादन घेतले जाते ही बाब लक्षात घेवून एकनाथराव खडसे यांनी आपल्या कृषिमंत्री पदाच्या कार्यकाळात जळगाव जिल्ह्यासाठी लिंबू वर्गीय फळ संशोधन केंद्र मंजूर केले होते आता मंत्री पदावरून राजीनामा दिल्यावर सुद्धा त्यासाठी पाठपुरावा सुरु ठेवला आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे चाळीसगाव येथील हिरापूर रस्त्यावरील कृषी विभागाच्या जागेत या केंद्राच्या उभारनिसाठीच्या जागेचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून निधीसुद्धा उपलब्ध होण्याच्या मार्गावर आहे या केंद्राद्वारे जळगाव जिल्ह्यातील लिंबू वर्गीय फळपिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन प्रयोग करण्यासाठी वाव मिळून कायमस्वरूपी असे हक्काचे माहिती केंद्र उपलब्ध होणार आहे.

एकनाथराव खडसे यांच्याकडे जे बारा खाते होते त्यापैकी पशुसंवर्धन व दुग्धविकास या खात्याच्या माध्यमातून त्यांनी पाठपुरावा करून जळगाव जिल्ह्यासाठी शासकीय पशु वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून घेतले होते. त्यसाठी अर्थमंत्री मा.सुधीर मूनगत्तीवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात निधीची घोषणा सुद्धा केळी होती परंतु एकनाथराव खडसे यांनी राजीनामा देताच हे काम थंडबस्त्यात पडले होते परंतु खडसे यांनी यासाठी पाठपुरावा सुरूच ठेवला आहे. त्यातून हे पशु वैद्यकीय महाविद्यालय चाळीसगाव येथील बिलाखेड शिवारात उभारले जाणार आहे.या महाविद्यालयाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. अश्याप्रकारे एकनाथराव खडसे यांनी शैक्षणिक व संशोधन प्रकल्पाच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्याच्या विकासाचे व समृद्धीचे स्वप्न पाहिले आहे ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी मंत्री पदी असताना जिल्ह्यात विविध प्रकल्प मंजूर करूनआणले  व आता मंत्रीपद नसतांना सुद्धा ते पूर्ण करण्यासाठी ते पाठपुरावा करत आहेत.

सर्वसामान्य जनतेसाठी एकनाथराव खडसे यांनी नेहमीच संघर्ष केलेला आहे कोणताही प्रश्न हाती घेतला की तो तडीस नेण्यास त्यांचा हातखंडा आहे आता एकनाथराव खडसे हे विधापरिषद या वरीष्ठ सभागृहाचे सदस्य आहेत अजून सुद्धा त्यांचा हे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे नुकत्याच झालेल्या विधापरिषदेच्या पावसाळी अधिवेशनात त्यांनी कृषी विद्यापीठाच्या विभाजनाचा, मुक्ताईनगर येथील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या पाण्यासाठी पाईप लाईन चा मुद्दा सभागृहात उपस्थित केला त्याचबरोबर रेंगाळत पडलेल्या पशु वैद्यकीय महाविद्यालय लवकरात लवकर व्हावे अशी आग्रही मागणी त्यांनी विधानपरिषदेत केली लोकहिताच्या या कार्यासाठी एकनाथ राव खडसे यांना सदैव जनतेची साथ लाभत आहे.परंतु हे प्रकल्प पूर्ण होवून जिल्ह्यात एक नवीन शैक्षणिक क्रांती घडण्यासाठी एकनाथराव खडसे  यांना इतर लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा साथ देणे गरजेचे आहे.

संघर्षशील असणाऱ्या मा.एकनाथराव खडसे यांनी शैक्षणिक व संशोधन प्रकल्पाच्या माध्यमातून पाहिलेले जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्न पूर्ण होणे त्यासाठी परमेश्वर त्यांना बळ देवो या सदिच्छा सह त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

पांडुरंग पुरुषोत्तम नाफडे
स्विय सहाय्यक
सौ. रोहिणी ताई खडसे खेवलकर

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!