राज्यसभेचे ८ खासदार निलंबित, सभापतींची कारवाई !
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)। कृषि विषयक विधेयकांवरून राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांवर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
अधिवेशनच्या सातव्या दिवशी (रविवारी) राज्यसभेत कृषि विधेयकांवर चर्चा आणि मतदान सुरू असताना सभागृहात गोंधळ उडाला होता. विधेयकं संमत करून घेण्यासाठी उपसभापतींनी राज्यसभेचे कामकाजाची वेळ वाढवली. यावर, उपसभापतींच्या निर्णयावर खासदारांनी जोरदार आक्षेप घेत खासदारांनी सभागृहातच नियम पुस्तिका फाडली तसेच माईकही तोडण्यात आला. विधेयकांवर चर्चा सरकारला नको. त्यांना केवळ लवकरात लवकर ही विधेयकं मंजूर करायची आहेत. ही विधेयकं आणण्यापूर्वी विरोधकांशी संवाद साधणे गरजेचे होते. सरकारने भारतीय मजूर संघालाही विश्वासात घेतलेले नाही. दरम्यान, आज (सोमवारी) संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आठवा दिवस आहे. आठ खासदारांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर सभागृहाचं कामकाज १०.०० वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन,आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह, राजू सातव, के के रागेश, रिपून बोरा, डोला सेन, सय्यद नझीर हुसैन आणि एलामारन करिम यांचा निलंबित खासदारांमध्ये समावेश आहे.