लँडिंग दरम्यान एअर इंडियाच्या विमानाचे दोन तुकडे; अपघातात वैमानिकाचा मृत्यू !
कोझिकोड (वृत्तसंस्था)। केरळच्या कोझिकोड येथील करिपूर विमानतळावर एअर इंडियाचे एक विमान उतरत असताना रनवे वरुन घसरले आहे. ज्यामुळे मोठा अपघात झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. विमान घसरल्यानंतर विमानाचे दोन तुकडे झाले. हे विमान दुबईहून आले होते. विमानातील १९० प्रवाशांपैकी किती लोक जखमी झाले आहेत, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. विमानाच्या पुढच्या भागाचा चुराडा झाल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. प्राथमिक माहितीनुसार वैमानिकाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे.
डीजीसीएच्या माहितीनुसार, एअर इंडिया एक्सप्रेस AXB1344 बोईंग 737 हे विमान दुबईहून येत होते. विमानात १९० प्रवाशी असल्याचे सांगितले जात आहे. मुसळधार पाऊस असल्यामुळे विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर घसरले. या अपघातात विमानाचे अक्षरशः दोन तुकडे झाले.