देशाची मोठी हानी ! संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन !
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : तामिळनाडूतील कुन्नूर येथे भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत देशाचे संरक्षण दलप्रमुख जनरल बिपीन रावत गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून देशासाठी ही सर्वात धक्कादायक अशी घटना आहे. रावत यांचे निधन झाल्याच्या वृत्ताला भारतीय हवाईदलाने दुजोरा दिला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सीडीएस बिपीन रावत हे आपल्या पत्नीसोबत एका कार्यक्रमासाठी तमिळनाडूला गेले होते. वेलिंग्टन येथे आर्म्ड फोर्सेजचं कॉलेज आहे. जेथे सीडीएस बिपीन रावत यांचं लेक्चर होतं. तेथून ते हेलिकॉप्टरने कुन्नूर येथे येत असताना कुन्नूर येथे त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. न्यूज एजन्सी एएनआयच्या वृत्तानुसार, या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 जण प्रवासी करत होते. यामध्ये बिपीन रावत, बिपीन रावत यांच्या पत्नी, लष्कराचे काही अधिकारी तसेच इतर सुरक्षारक्षक, कमांडोज उपस्थित होते.
सीडीएस बिपिन रावत यांनी आपल्या आयुष्यातील ३७ वर्षे लष्करासाठी समर्पित केली. आता त्यांच्याकडे आणखी अनेक जबाबदाऱ्या होत्या. देशाच्या सुरक्षा मंत्र्यांच्या मुख्य सल्लागारांपैकी एक होते. बिपिन रावत नेहमी म्हणायचे की, त्यांनी एकट्याने काहीही केले नाही, ते त्यांच्या टीममुळे या पदापर्यंत पोहचले आहेत. त्यांनी गोरखा बटालियनपासून सुरुवात केली, त्यांनी सैन्यात अनेक पदांचा कार्यभार स्वीकारला. ते लष्करप्रमुख झाले, त्यानंतर त्यांची भारतातील पहिली सीडीएस अधिकारी म्हणूनही नियुक्ती झाली. सीडीएस बिपीन रावत यांचा इथपर्यतचा प्रवासही तितकाच खडतर होता. त्यांच्या याच प्रवासाबद्दल आपण जाणून घेणार आहोत.