“ड्रग्जचा खेळ गुजरातमधून सुरू तर नाही”? नवाब मलिकांचा भाजपला सवाल
मुंबई, प्रतिनिधी : मुंबई शहर ड्रग्जचं हब झालं आहे, असा दावा वारंवार भाजपकडून केला जात. मात्र, गुजरातमध्ये दोन वेळा मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केलं आहे. गुजरातच्या द्वारकात जवळपास ३५० कोटी रुपयांचं स्थानिक पोलिसांनी ड्रग्ज जप्त केलं आहे. ड्रग्जचा खेळ गुजरातमधून तर सुरू झाला नाही ना ?, असा सवाल राज्याचं अल्पसंख्यांक मंत्री नबाव मलिक यांनी केंद्र भाजपला केला आहे.
या प्रकरणात मनिष भानुशाली, धवल भानुशाली, केपी गोसावी आणि सुनील पाटील हे सर्व जण अहमदाबादच्या नोवाटल आणि फाईव्ह स्टार हॉटेलात होते. गुजरातच्या मंत्र्यासोबत त्यांचे फोटो आहेत. गुजरातच्या मंत्र्यासोबत किरीटसिंह राणा यांच्याशी संबंध आहेत. हे लोक गुजरातमधून ड्रग्ज रॅकेट ऑपरेट करत आहेत, असं सांगतानाच ड्रग्जचा खेळ गुजरातमधून तर सुरू नाही ना? असा सवाल मलिक यांनी केला आहे. गुजरातमधील द्वारकामध्ये जवळपास ३५० कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. गुजरात पोलिसांनी जवळपास १६ किलो हेरॉईन आणि एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. हे ड्रग्ज पाकिस्तानच्या समुद्राच्या मार्गे येत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाल्यानंतर त्यांनी धाड टाकून ड्रग्ज जप्त केलं
महाराष्ट्राचं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांचं जावई यांच्याबद्दल बदनामी करणारं व्यक्तव्य केले आहे. समीर खान यांच्या घरात ड्रग्ज सापडले होतं, असे फडणवीस म्हणालं. फडणवीसांच्या वक्तव्यविरोधात मलिकांची मुलगी नीलोफर यांनी नोटीस पाठवली आहे. या प्रकरणी फडणवीसांनी माफी मागावी नाही तर क्रिमिनल आणि सिव्हिल सूट फाईल आहे, असे म्हणालं. तसेच प्रत्येक व्यक्तीला राईट टू स्पीक आहे. मात्र, राईट टू अब्यूस असा अधिकार नाही.