ब्रेकिंग : भाजपची पुन्हा मुसंडी; उपराष्ट्रपती निवडणुकीत जगदीप धनखडांचा जयजयकार
नवी दिल्ली, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक पार पडली. या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांचा विजय झाला आहे. तर यूपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव झाला आहे. जगदीप यांना 528 मतं मिळाल्याची माहिती समोर आली आहे. यूपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा आणि एनडीएचे जगदीप धनखड यांच्यात लढत झाली. यालढतीत धनखड यांनी बाजी मारली आहे.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपत आहे. व्यंकय्या नायडू यांच्यानंतर देशाचे पुढील उपराष्ट्रपती कोण होणार याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. एमडीएचे उमेदवार जगदीप धनकड यांचा विजय झाला आहे. धनकड यांना 528 मतं मिळाली तर अल्वा यांना 182 मतं मिळाली. विरोधी पक्षांच्या उमेदार मार्गारेट अल्वा यांचा पराभव झाला आहे. निवडणुकीत आज 780 पैकी 725 खासदारांनी मतदान केलं. यापैकी तृणमूल काँग्रेसच्या लोकसभा आणि राज्यसभा मिळून एकूण 36 खासदारांनी तटस्थ राहण्याचं ठरवलेलं होतं.
दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील खासदारांनी मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा दर्शवला होता. पण प्रत्यक्ष निवडणुकीत शिवसेनेच्या सहा खासदारांनी मतदानाचं केलं नाही. उपराष्ट्रपती पदासाठी आज सकाळी 10 वाजता सुरू झालेले मतदान सायंकाळी 5 वाजता संपले. यानंतर सायंकाळी सहा वाजता मतमोजणी सुरू झाली.
जगदीप धनखड हे सध्या पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत. त्यांचे राजस्थानशी घट्ट नाते आहे. त्यांचे जन्मस्थान झुंझुनू आणि कर्मस्थळ जयपूर उच्च न्यायालय होते. ते राजस्थान हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष राहिले आहेत. धनखड हे राजकारणातील अनुभवी खेळाडू आहेत. ते 11 वर्षे काँग्रेसमध्ये होते. त्यांचे मेहुणे धरमपाल चौधरी हे अलवर न्यायालयात वरिष्ठ वकील आहेत.