भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयराजकीयराष्ट्रीय

जगातील सर्व नेत्यांना मागे टाकलं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रचला इतिहास

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नवी दिल्ली : कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जगभरातील लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे. अमेरिकन एजन्सी मॉर्निंग कंसल्‍टने केलेल्या सर्वेतून ही महत्त्वपूर्व बाब समोर आली आहे. एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार पीएम मोदींची एकूण अप्रूवल रेटिंग 55 आहे. एजन्सीच्या रिपोर्टमध्ये असंही दाखविण्यात आलं आहे की, नरेंद्र मोदींची लोकप्रियता सर्व जागतिक नेत्यांपेक्षा सर्वात अधिक आहे. ही एजन्सी जगभरातील नेत आणि सरकारची अप्रूवल रेटिंग जारी करते.

मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्स यांनी वर्तमान परिस्थितीत 13 देशांतील (ऑस्ट्रेलिया, ब्राजील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, जपान, मॅक्सिको, दक्षिण कोरिया, स्पेन, यूनाइटेड किंगडम, संयुक्त राज्य अमेरिका) नेत्याची  अप्रूवल रेटिंग जारी केली आहे. एजन्सीच्या ताज्या सर्वेमध्ये पीएम मोदी यांच्याव्यतिरिक्त ज्या अन्य नेत्यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे, त्यात मॅक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष एंड्रेस मॅनुअल लोपेज ओबराडोर आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचा सहभाग आहे. सर्वेनुसार 22 डिसेंबरपर्यंत मॅक्सिकन राष्ट्राध्यक्ष एंड्रेस मॅनुअल लोपेज ओब्रेडोर यांचा स्कोअर 29 होता, तर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचा स्कोअर 27 होता.

यादरम्यान PM नरेंद्र मोदी भारतात जगातील सर्वात मोठं कोरोना लशीच्या टीकाकरणाचं अभियान सुरू करणार आहेत. त्यांनी आज गुजरातमधील राजकोटमध्ये एम्सची पायाभरणी करताना याबाबत विधान केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत जगातील सर्वात मोठा लशीकरण (Covid-19 vaccination) अभियान चालविण्याची तयारी करीत आहे. ते पुढे म्हणाले की, देशात कोरोना संसर्गाची नवी प्रकरणांची संख्या आता कमी होत आहे. आम्ही पुढील वर्षी जगातील सर्वात मोठं लशीकरण कार्यक्रम चालविण्याची तयारी करीत आहोत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!