भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यराष्ट्रीय

Corona : कोरोनाचे आव्हान अद्याप पूर्णपणे संपलेले नाही; कोरोनावर पंतप्रधान मोदींनी दिला कानमंत्र !

नवी दिल्ली, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : कोरोनाचे आव्हान अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. ओमिक्रॉन आणि त्याची सर्व रूपे कशी गंभीर परिस्थिती निर्माण करू शकतात. हे आपण युरोपातील देशांमध्ये पाहू शकतो. तर वयोगटानुसार सर्व पात्र बालकांचे लवकरात लवकर लसीकरण करणे ही आमची प्राथमिकता असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना (Corona)  विषाणूच्या ताज्या परिस्थितीवर सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली यावेळी सांगितले.

पीएम मोदी म्हणाले की, “कोरोनाचे आव्हान अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. ओमिक्रॉन आणि त्याचे सब व्हेरिएंट कसे गंभीर परिस्थिती निर्माण करू शकतात, हे आपण युरोपमधील देशांमध्ये पाहू शकतो. गेल्या काही दिवसांत अनेक देशांमध्ये कोरोना केसेस वाढत आहेत. पण भारतात परिस्थती नियंत्रणात आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून रुग्णसंख्या वाढत असल्याने अलर्ट राहणे गरजेचे आहे. मागील कोरोना लाटेने आम्हाला खूप काही शिकवले, ओमिक्रॉन व्हेरिएंटचा यशस्वीपणे सामना केला.”

आपल्याला  पूर्वीप्रमाणेच शाळांमध्येही विशेष मोहीम राबवावी लागणार आहे. देशात पुन्हा एकदा कोरोनाची प्रकरणे वाढू लागली आहेत. दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटकसह 10 राज्ये अशी आहेत जिथे धोक्याची चिन्हे आहेत. याचपार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी मोदींनी कोरोनावर काही कानमंत्र दिले आहेत. लसीकरण मोठे संरक्षण कवल, मास्क वापरणे गरजेचे असल्याचे मोदींनी स्पष्ट केले आहे.

यावेळी पंतप्रधान म्हणाले की, गेल्या दोन वर्षांतील कोरोनासंदर्भात आमची ही 24 वी बैठक आहे. कोरोनाच्या काळात केंद्र आणि राज्यांनी ज्या प्रकारे एकत्र काम केले आणि ज्यांनी देशाच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावली. मी सर्व कोरोना योद्ध्यांचे कौतुक करतो. गेल्या 2 आठवड्यांपासून वाढत्या कोरोना बाधीतांच्या संख्येमुळे आपल्याला सतर्क राहावे लागेल. आरोग्याच्या पायाभूत सुविधांपासून ते ऑक्सिजन पुरवठ्यापर्यंत कोरोनाशी संबंधित प्रत्येक बाबीमध्ये आवश्यक ते उपलब्ध करून देण्याचे काम देशाने 2 वर्षात केले आहे.

आपल्या देशात बऱ्याच काळानंतर शाळा सुरू झाल्या आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाचे रुग्ण वाढल्याने कुटुंबीयांची चिंता वाढत आहे. काही शाळांमधून मुलांना संसर्ग झाल्याचे वृत्त आहे. अधिकाधिक बालकांना लसीचे कवच मिळत आहे, ही समाधानाची बाब आहे. ते पुढे म्हणाले की, आज भारतातील 96% प्रौढ लोकसंख्येला लसीचा पहिला डोस मिळाला आहे आणि 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सुमारे 85% मुलांना दुसरा डोस मिळाला आहे. मार्चमध्ये, आम्ही 12-14 वर्षांच्या मुलांसाठी लसीकरण सुरू केले. आता 6-12 वयोगटातील मुलांसाठी देखील डोसची परवानगी देण्यात आली आहे.

तर सर्व पात्र बालकांना लवकरात लवकर लसीकरण करणे हे आमचे प्राधान्य आहे. त्यासाठी पूर्वीप्रमाणे शाळांमध्येही विशेष मोहीम राबवावी लागणार आहे. याबाबत शिक्षक आणि पालकांनी जागरुक राहावे, याचीही काळजी आपण घेतली पाहिजे. ते पुढे म्हणाले की, तिसऱ्या लाटेदरम्यान, आम्ही दररोज 3 लाखांहून अधिक प्रकरणे पाहिली. आपल्या सर्व राज्यांनी त्यांना हाताळले आणि इतर सर्व सामाजिक आणि आर्थिक क्रियाकलापांना चालना दिली. आमचे शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ राष्ट्रीय आणि जागतिक परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!