भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रावेर तर्फे “स्वराज्य सप्ताह” चे आयोजन

रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांच्या मान्यतेने व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रविंद्र नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रावेर लोकसभेचे जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश आयोजित स्वराज्य सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.


कार्यक्रमाचे स्वरूप हे दोन स्पर्धा घेऊन करण्यात आलेले आहे. पहिली स्पर्धा ही वकृत्व स्पर्धा आहे व दुसरी रील स्पर्धा असणार आहे ह्या स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. स्पर्धेचा विषय रयतेच राज्य शिवरायांचं हा आहे. आपला भाषणाचा व रील व्हिडिओ तयार करून २८/०२/२०२५ या तारखेच्या आत ७०२८२२७८०४ या व्हॉट्स अँप क्रमकावर पाठवायचा आहे. या स्पर्धेचे पारितोषिक हे ऑनलाईन पद्धतीनेच दिले जाणार आहे वकृत्व स्पर्धेसाठी प्रथम बक्षीच ४००१/- द्वितीय बक्षीच ३००१/- तृतीय बक्षीच २००१/- आहे तसेच रील स्पर्धेसाठी प्रथम बक्षीच ३००१/- द्वितीय बक्षीच २००१/- तृतीय बक्षीच १००१/- ठेवण्यात आलेले आहे. या स्पर्धे मध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रावेर लोकसभेचे जिल्हा अध्यक्ष राकेश सोनार यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!