भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राजकीय

‘ओबीसी’आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलली, निवडणुकांचे भवितव्य लांबणीवर

नवी दिल्ली,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। मुंबई, नाशिक, पुण्यासह १७ पेक्षा अधिक महापालिकांच्या निवडणुका ‘ओबीसी’ आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित असून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ‘ओबीसी’ आरक्षणाबाबत दाखल असलेल्या याचिकांवरची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. परंतु आता ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

तसेच या याचिकेवरील पुढील सुनावणी आता ४ मे रोजी होणार आहे. त्यामुळे राज्यात होणाऱ्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या सुनावणीकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ‘ओबीसी’ आरक्षणाला फटका बसल्याने राज्य सरकारने निवडणूक कायद्यात दुरुस्ती करून प्रभागरचना करण्याचे अधिकार आपल्याकडे घेतले आहेत. त्यामुळे या सुनावणीस महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाने महापालिका प्रशासनाला प्रभाग रचना करण्याबाबतचे सुधारित आदेश पाठवले आहेत. या आदेशांच्या अनुषंगाने प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात मुदत मागितली होती. त्यानुसार ही सुनावणी आता ४ मे रोजी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!