सोने-चांदीच्या भावात मोठ्या घसरणीचे संकेत, ….तर ऐतिहासीक घसरण होणार..
नवी दिल्ली, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सोने-चांदीतील घसरणीने सध्या ग्राहक खुश आहेत. अमेरिकन बाजारात डॉलरने घेतलेली उसळी त्यासाठी कारणीभूत आहे. बाजारातील संकेतानुसार, डॉलर अजून मजबूत झाल्यास सोने-चांदीच्या भावात ऐतिहासिक मोठी घसरण होऊ शकते. गेल्या दोन आठवड्यात सोने-चांदीची चमक फिक्की पडली आहे. मे आणि जून महिन्याच्या ट्रॅकवर या किंमती येताना दिसत आहेत. मे आणि जून महिन्यात सोने-चांदीच्या किंमतीत घसरण झाली होती. जुलै महिन्यात दोन्ही धातूंनी आगेकूच केली होती. या आठवड्यात सोने 60,000 रुपयांपेक्षा ही उतरले आहे. चांदी 5300 रुपयांनी स्वस्त झाली आहे. पण जागतिक बाजारातील संकेत ग्राहकांशा आनंदवार्ता देणारे आहेत. जागतिक बाजारात सोन्याच्या किंमती महिनाभराच्या निच्चांकावर आहे. डॉलर अजून मजूबत झाल्यास या किंमतीत ऐतिहासीक घसरण होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत सोने 58,000 रुपयांपर्यंत खाली उतरले आहे. त्यापेक्षा ही घसरण अधिक असू शकते. त्यातच भारतातील गुडरिटर्न्स या सोने-चांदीचे दर अपडेट करणाऱ्या संकेतस्थळाने 24 कॅरेट सोन्यात 4,000 रुपयांची घसरण नोंदवली आहे. सोन्यात मोठी पडझड होईल का लवकरच समोर येईल.
सलग चार दिवस पडझड
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत सोने 1000 रुपयांनी घसरले. या दिवसांत सोन्यामध्ये केवळ दोनदा वाढ झाली आहे. ऑगस्टच्या पहिल्या दिवशी सोन्याने 150 रुपयांची उसळी घेतली होती. तर 5 ऑगस्ट रोजी सोने 200 रुपयांनी वधारले होते. तर 8,9,10,11 ऑगस्ट या चार दिवसांत सोन्यात 600 रुपयांची घसरण झाली.
असे झाले स्वस्त सोने
गुडरिटर्न्सनुसार, या आठवड्यात 6,7 ऑगस्ट रोजी मोठी दरवाढ झाली नाही. तर 8 ऑगस्ट रोजी सोन्यात 100 रुपयांची घसरण झाली. 9 ऑगस्ट रोजी पुन्हा 100 रुपयांची स्वस्ताई आली. 10 ऑगस्ट रोजी सोन्याचे भाव 250 रुपयांनी कमी झाले. 11 ऑगस्ट रोजी सोने 150 रुपयांनी स्वस्त झाले. 22 कॅरेट सोने 54,700 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,660 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आहे.
चांदीत 5300 रुपयांनी स्वस्त
ऑगस्ट महिन्यात स्वस्ताईत चांदीने सोन्यावर मात केली. चांदी 5300 रुपयांनी घसरली. आठवड्यात सोमवारी 100 रुपयांनी या किंमती घसरल्या. मंगळवारी चांदी 1000 रुपयांनी घसरली. बुधवारी चांदीचा भाव 500 रुपयांनी उतरला. चार दिवसांत या किंमतीत 2100 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 73,000 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
24 कॅरेट सोने 58,909 रुपये, 23 कॅरेट 58,673 रुपये, 22 कॅरेट सोने 53,961 रुपये, 18 कॅरेट 44,182 रुपये, 14 कॅरेट सोने 34,462 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 70,176 रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.