एलियंस असल्याचा दावा : ठिकाण सापडले, कूठे राहातात एलियन्स?
नवी दिल्ली ,मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। एलियन शोधाशी संबंधित मोहिमांमध्ये रेडिओ सिग्नलपासून अंतराळ यानापर्यंत सर्व काही अमेरिकेची अंतराळ संशोध संस्था नासा (NASA) ने तैनात केले आहे. नासाने मंगळावर जीवनाचा पुरावा शोधण्यासाठी रोव्हर पाठवले आहेत. मात्र, एलियन्सचे अस्तित्व सिद्ध करणारा असा कोणताही पुरावा अद्याप सापडलेला नाही. ब्रह्मांडात एलियन्स आहेत की नाही हे स्पष्ट जरी नसले तरी या बाबत अमेरिकेच्या माजी गुप्तचर अधिकाऱ्यांनी धक्कादायक दावा केला आहे.
अमेरिकेच्या माजी गुप्तचर अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एलियन्सचे ठिकाण सापडले असून, अमेरिकेकडे UFO (उडत्या तबकड्या) आहे. अमेरिकेचे माजी गुप्तचर अधिकारी डेव्हिड ग्रुश यांनी हा दावा केला आहे. ते म्हणाले की, यूएफओ व्यतिरिक्त, अमेरिकेकडे एलियनचा मृतदेह देखील आहे. एवढेच नाही तर दोन वर्षांपूर्वी अंटार्क्टिकामध्ये बर्फाच्छादित यूएफओ (उडत्या तबकड्या) दिसल्या होत्या. ज्यांची छायाचित्रेही सॅटेलाइटवरून क्लिक करण्यात आली आहेत. गुप्तचर यंत्रणांनी दावा केला होता की, या ठिकाणी एलियन्ससह एक यूएफओ आला होता. यासोबतच, नासा आता एका नवीन मोहिमेवर काम करत आहे. ज्यामध्ये ते कोणत्याही ग्रहावर एलियन्सचे वास्तव्य आहे की नाही हे पूर्णपणे शोधण्यात सक्षम असणार आहे.
एलियन्स पत्ता सांगितला नासाने
अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने दावा केला आहे की, एलियन्सची एक वेगळीच दुनिया आहे. ती ऊर्ट क्लाउडच्या मागे लपलेली आहे. ती सूर्यापासून कोसो दूर आहे. तज्ज्ञांनी याबाबत सांगितले की, एवढ्या दूर आतापर्यंत कोणत्याच ग्रहाचा शोध लावण्यात आलेला नाही. तेव्हा होऊ शकते की त्या ग्रहावर एलिअंस राहत असतील. त्या ग्रहाबाबत बोलले जात आहे त्याला अनाथही म्हटले जाते. असे का म्हटले जाते कारण, अशा ग्रहाबाबत कुणाकडेच काहीच माहिती नाही आणि तेथे कुणी पोहचलेसुद्धा नाही. मात्र, आता नासाने केलेल्या दाव्यानंतर त्या ग्रहाबाबत माहिती गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
शास्त्रज्ज्ञांनी केला दावा
शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, आपल्या सूर्यमालेत बरेच एक्सोप्लॅनेट आहेत, जे खूप दूर आहेत. या एक्सोप्लॅनेटची खास गोष्ट म्हणजे एका बाजूला नेहमी अंधार असतो, तर दुसऱ्या बाजूला सूर्यप्रकाश असतो. अहवालानुसार, शास्त्रज्ज्ञ दावा करत आहेत की, एक्सोप्लॅनेटच्या या गडद भागात एलियन राहतात. त्यांचा असा विश्वास आहे की, बाहेरील ग्रहांभोवती एक पट्टा आहे जिथे पाणी देखील मोठ्या प्रमाणात आहे.