भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीय

आतांची मोठी बातमी ; मद्य घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्र्यांना सीबीआयचे समन्स

नवी दिल्ली,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष एकत्र येताना दिसत असताना देशात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत,विरोधी पक्षांमध्ये अरविंद केजरीवाल हे देखील महत्त्वाचे आहेत. या सगळया घडामोडी एकीकडे घडत असताना केजरीवाल यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर येत आहे.दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणाचा तपास आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत पोहोचला आहे.

या प्रकरणात आता सीबीआय आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चौकशी करणार आहे. सीबीआयने अरविंद केजरीवाल यांना चौकशीचे समन्स बजावले आहेत. केजरीवाल यांना येत्या १६ एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आपचे नेते खासदार संजय सिंह संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची सविस्तर माहिती देणार आहेत. पण सीबीआयने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीचे समन्स देणं हे धक्कादायक आहे. त्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सीबीआयच्या चौकशीत आता अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!