भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयराष्ट्रीयसामाजिक

2000 रुपयांच्या नोटा बदलण्या संदर्भात मोठी बातमी

नवी दिल्ली,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। 2000 च्या नोटा बदलण्याची 30 सप्टेंबर 2023 रोजी ही शेवटची तारीख होती. दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची अंतिम मुदत आता अगदी तोंडावर आली असताना ही डेडलाईन वाढण्याची शक्यता आहे. Moneycontrol च्या वृत्तानुसार, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याविषयीचा खुलासा केला आहे. त्यानुसार भारतीय रिझर्व्ह बँक 2,000 रुपयांची नोट माघारी बोलविण्यासाठी मुदतवाढ करण्याची शक्यता आहे.

अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार आरबीआय 2,000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी आणि बदलण्यासाठी मुदत वाढ देऊ शकते. काही परदेशी नागरिकांना या नोटा बदलण्यासाठी वेळ हवा असल्याचे समोर येत आहे.

93 टक्के नोटा आल्या परत
आतापर्यंत 3.32 लाख कोटी रुपये मूल्याच्या 2,000 रुपयांच्या नोटा माघारी बोलावल्या होत्या. वृत्तानुसार, रिझर्व्ह बँकेने 1 सप्टेंबर रोजी सांगितल्याप्रमाणे, त्यातील 93 टक्के नोटा परत आल्या आहेत. 31 जुलैपर्यंत 3.14 लाख कोटी रुपयांच्या 88 टक्के नोटा बँकेत जमा करण्यात आल्या होत्या. यावर्षी आरबीआयने 19 मे रोजी 2,000 रुपयांच्या नोट माघारी बोलविण्याची घोषणा केली होती आणि लागलीच या निर्णयावर अंमलबजावणी सुरु करण्यात आली होती.

काय झाला होता निर्णय
भारतीय रिझर्व्ह बँकेने 19 मे रोजी 2,000 रुपयांच्या नोटा माघारी बोलविण्याची घोषणा केली होती. केंद्र सरकारने 2016 मध्ये 500 आणि 1,000 रुपयांची नोटाबंदी करण्यात आली होती. त्यानंतर 2,000 रुपयांची नोटी व्यवहारात सादर करण्यात आली. काळ्या धनाविरोधात कारवाईसाठी ही नोटबंदी करण्यात आली होती.

मुदत वाढ ची नवीन तारीख कोणती
आरबीआय मुदत वाढ करण्याची चर्चा सध्या रंगली आहे. 2000 रुपयांच्या गुलाबी नोटा बदलण्यासाठी एक महिन्यांचा कालावधी वाढून दिल्या जाऊ शकतो. पुढील महिन्याची शेवटची तारीख निश्चित केल्या जाऊ शकते. अर्थात याविषयीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. आरबीआयने पण याविषयीची अधिकृत घोषणा केलेली नाही.

या कारणामुळे वाढवली मुदत
यापूर्वी नोटाबंदी करताना केंद्र सरकारने ही गुलाबी नोट बाजारात उतरवली होती. या नोटांचा पण साठ होत असल्याचा आरोप होत होता. तर केंद्र सरकारने अनेक दिवसांपासून त्यांची छपाई बंद केली होती. या नोटा गेल्या वर्षापासून चलनातूनही गायब झाल्या होत्या. पण मे महिन्यात आरबीआयने ही नोट माघारी बोलविण्याची कवायत सुरु केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!