भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयराष्ट्रीय

२००० हजारांच्या नोटा बदलण्याची मुदत वाढवली, “या” तारखे पर्यंत जमा करता येणार नोटा, पण….

नवी दिल्ली,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आरबीआयने १९ मे २०२३ रोजी २ हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी ३० सप्टेंबर पर्यंतच मुदत दिली होती. ही घोषणा केली तेव्हा दोन हजारांच्या ३.४२ लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या. त्यापैकी आता फक्त ०.१४ लाख कोटी रुपयांच्या नोटा जमा होणे बाकी आहे. भारतीय रिजर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी मुदत वाढवण्यात आली आहे.

दरम्यान, आरबीआयने ७ ऑक्टोबरपर्यंत नोटा जमा करण्याची मुदत वाढवली आहे. पण ही प्रक्रिया आरबीआयने निश्चित केलेल्या १९ कार्यालयांमध्येच होणार आहे.

नोटा बदलण्यासाठी व्यक्ती किंवा संस्था आरबीआय़ने निश्चित केलेल्या १९ ऑफिसमध्ये टेंडर करू शकतात. तिथून भारतातील त्यांच्या बँक खात्यात जमा होतील. दोन हजार रुपयांच्या नोटा पोस्टाने त्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी आरबीआयने सांगितलेल्या १९ कार्यालयांपैकी एका ठिकाणी पाठवता येतील. त्यानंतर ती रक्कम खात्यावर जमा केली जाईल.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!