नवीन वर्षाचं गिफ्ट! LPG सिलिंडरच्या किमती ‘इतक्या’ रुपयांनी कमी
नवी दिल्ली,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। तेल कंपन्यांनी १९ किलोच्या कमर्शिअल एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत अंशतः कपात केली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कंपन्यांनी सिलिंडरच्या दरात १.५० पैसे (दीड रुपये ) रुपयांची कपात केली आहे. नवीन किमती आजपासून म्हणजेच नवीन वर्ष २०२४ च्या पहिल्या दिवसापासून लागू होतील. मात्र घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. घराच्या किचनमध्ये वापरले जाणारे सिलिंडर जुन्या दरानेच मिळतील. यंदाचं हे वर्ष निवडणुकीचं वर्ष असताना अशा वेळी सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती.
ग्राहकांची चेष्टा
तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतींमध्ये फक्त १.५० (दीड रुपया) किंमत कमी केल्याने ग्राहकांची चेष्टा केली की काय?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
घरगुती सिलिंडरचे दर स्थिर
घरगुती एलपीजी सिलिंडर म्हणजेच १४ किलोच्या सिलिंडरबद्दल बोलायचे झाले तर यावेळीही ग्राहकांची निराशा झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. यामध्ये शेवटचा बदल ३० ऑगस्ट रोजी झाला होता. म्हणजेच १४ किलोच्या सिलिंडरची किंमत ४ महिन्यांपासून स्थिर आहे.