विरोधात मतदान करणारे हे “दोन” खासदार कोण? महिला आरक्षण विधेयकाला फक्त “या” दोघांचा विरोध
नवी दिल्ली,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आज बुधवारी लोकसभेत प्रदीर्घ चर्चेनंतर संध्याकाळी महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या विरोधात फक्त दोन मते पडली, हे दोन सदस्य कोण?
महिला आरक्षण विधेयक हे घटनादुरुस्ती विधेयक होते, त्यामुळे काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही सरकारला पाठिंबा दिला. काही लोकांनी विरोध केला असला तरी सरकारच्या पाठीशी उभे राहिलेले दिसले. त्या मुळे महिला आरक्षण विधेयकाच्या बाजूने ४५४ मते पडली. हे विधेयक लोकसभेत दोन तृतीयांश बहुमताने मंजूर करण्यात आले आहे. मात्र याच्या विरोधात फक्त २ मते पडली, ही दोन खासदार असदुद्दीन ओवेसी आणि त्यांच्या पार्टी चे सांसद सय्यद इम्तियाज जलील यानी महिला आरक्षण विधेयकाला विरोध करत विरोधात मतदान केले .