भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयराष्ट्रीय

महिला आरक्षण विधेयक, १८१ जागा राखीव, किती वर्षांसाठी हे आरक्षण … विधेयकातील प्रमुख मुद्दे..जाणून घ्या..

नवी दिल्ली, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। नवीन संसद भवनात सरकारने लोकसभेच्या कामकाजात पहिले विधेयक सादर केले. पहिलेच विधेयक महिला आरक्षणाशी संबंधित आहे. त्याला ‘नारी शक्ती वंदन कायदा’ असे नाव देण्यात आले आहे.


केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हे विधेयक मांडले. या विधेयकात लोकसभा आणि विधानसभेच्या ३३ टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. याचा अर्थ आता लोकसभा आणि विधानसभेची प्रत्येक तिसरी सदस्य एक महिला असेल.

विधेयकातील प्रमुख ठळक मुद्दे काय आहेत?
जागांच्या बाबतीत काय बदल होणार?
लोकसभेत सध्या ८२ महिला सदस्य आहेत. हे विधेयक कायदा झाल्यानंतर लोकसभेत महिला सदस्यांसाठी १८१ जागा राखीव असतील. तसेच हे विधेयक १५ वर्षांसाठी असेल.

  • या विधेयकात संविधानाच्या कलम २३९AA अंतर्गत राजधानी दिल्लीच्या विधानसभेत महिलांना ३३% आरक्षण देण्यात आले आहे. म्हणजेच आता दिल्ली विधानसभेच्या ७९ पैकी २३ जागा महिलांसाठी असतील.
  • केवळ लोकसभा आणि दिल्ली विधानसभाच नाही तर इतर राज्यांच्या विधानसभांमध्येही ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे.
  • आरक्षण किती दिवस टिकणार?
    या विधेयकानुसार महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये १५ वर्षांसाठी आरक्षण मिळणार आहे. १५ वर्षांनंतर महिलांना आरक्षण देण्यासाठी पुन्हा विधेयक आणावे लागणार आहे.
  • एससी-एसटी महिलांचे काय?
    एससी-एसटी महिलांना वेगळे आरक्षण मिळणार नाही. आरक्षणाची ही व्यवस्था आरक्षणातच करण्यात आली आहे. म्हणजेच लोकसभा आणि विधानसभांमध्ये एससी-एसटी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या सर्व जागांपैकी केवळ 33% महिलांसाठी असतील. असे समजून घ्या की, आता सध्या लोकसभेच्या ८४ जागा एससीसाठी आणि ४७ जागा एसटीसाठी राखीव आहेत. विधेयकाचा कायदा झाल्यानंतर ८४ SC जागांपैकी २८ जागा SC महिलांसाठी राखीव असतील. तसेच ४७ एसटी जागांपैकी १६ एसटी महिलांसाठी असतील.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!