भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयसामाजिक

मोठी बातमी : पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकणार

नवी दिल्ली,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। इस्त्राईल-पॅलेस्टाईन युद्धाची धग आता सर्वच देशांना बसत आहे. भारत पण या युद्धाच्या परिणामांपासून अलिप्त राहू शकत नाही. गेल्या दीड वर्षांपासून देशांतर्गत पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर ठेवण्यात केंद्र सरकारने यश मिळवले. कंपन्या तोटा होऊन पण हा निर्णय बदलला नाही. आता पाच राज्यांच्या निवडणूक आणि लोकसभा निवडणूक २०२४ ची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर ठेवणे अथवा त्यात ५ रुपयांपर्यंत कपातीची शक्यता होती. पण या शक्यतेवर हमासच्या एका हल्ल्याने पाणी फेरले. जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किंमती भडकण्याची भीती आहे. त्यामुळे सरकारी कंपन्या किती काळ तग धरतील हा प्रश्न आहे. त्याचा परिणाम भारतीय बाजारात दिसू शकतो. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर परिणाम दिसू शकतो.

या युद्धात तेल ओतण्याचे काम इराण करत आहे. इस्त्राईलवर दहशतवादी संघटना हमासने केलेल्या हल्ल्याचे या देशाने कौतुक केले आहे. तसेच जाहीर पाठिंबा दिला आहे. हे युद्ध जास्त दिवस सुरु राहिले तर त्याचा फटका लागलीच दिसून येईल. कच्चा तेलाचे भाव लवकरच शतक ठोकतील. ब्रेंट क्रूड ऑईल लवकरच १०० डॉलर पेक्षा जास्त झेप घेऊ शकते.

रविवारी याविषयीचा अहवाल गोल्डमॅनने सादर केला. त्यानुसार जून २०२४ पर्यंत ब्रेंट क्रूड ऑईल शतक ठोकेल. कच्चे तेलाचे भाव १०० डॉलर पेक्षा अधिक होतील. सध्या त्याचा मोठा परिणाम दिसणार नाही. युद्ध लांबले तर मात्र कच्चा तेलाच्या किंमती वाढतील. सौदी अरब अथवा इराणने कच्चा तेलाचे उत्पादन कमी केले तर मात्र हे संकट गंभीर होईल.

एचडीएफसी सिक्युरिटीनुसार, कच्चा तेलाच्या किंमतीत सातत्याने चढउताराचे सत्र येऊ शकते. कच्चा तेलाचे किंमती ९५ डॉलर प्रति बॅरलवर जातील. या किंमती ८० ते ८५ डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरु शकतील. इस्त्राईल आणि हमास यांच्यात लवकर युद्ध विराम न झाल्यास त्याचा फटका संपूर्ण जगाला भोगावा लागेल. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होऊ शकते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!