भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रशैक्षणिक

सर्वच माध्यमांच्या शाळांमध्ये मराठीची सक्ती,राज ठाकरे यांच्या विनंतीनंतर शिक्षण मंत्र्यांची घोषणा

नवी मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। नवी मुंबईत वाशी येथील सीडको प्रदर्शन केंद्रात तीन दिवसीय विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी मराठी भाषेबाबत आपले मत व्यक्त राज्य सरकारकडे सर्वच माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषेची सक्ती करावी, अशी विनंती केली. या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे देखील उपस्थित होते. त्यामुळे राज ठाकरे यांच्या विनंतीनंतर या वेळी, नवीन शालेय वर्षापासून सर्वच माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी सक्तीची केली जाणार असल्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आल्याची मोठी घोषणा दीपक केसरकर यांच्याकडून करण्यात आली .

महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये पहिलीपासून दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य करावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी विश्व मराठी संमेलनाच्या कार्यक्रमात केली. याबाबत बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, राज ठाकरेंनी केलेल्या विनंतीबाबत सर्वांना आनंदाची बातमी सांगावीशी वाटते की, या वर्षापासून पहिली ते दहावी हे मराठी सक्तीचे करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे की, याच्या पुढच्या काळामध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार उच्च शिक्षण सुद्धा मराठीमध्ये देण्यात येणार आहे. त्याशिवाय इंजिनिअरींगचे शिक्षण सुद्धा मराठीमध्ये देण्यात येणार असल्याची माहिती केसरकरांकडून या कार्यक्रमात देण्यात आली आहे.

वाशी येथील विश्व मराठी संमेलनाच्या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, माईक समोर आला की राजकारण बाजूला ठेऊन बोलावे लागते. त्यातही सरकारचा कार्यक्रम म्हटल्यावर अजूनही काही गोष्टी बाजूला ठेवाव्या लागतात. पण मला असे वाटते की आणि दीपक केसरकर यांना विनंती आहे की, सरकारतर्फे महाराष्ट्रामध्ये जितक्या शाळा असतील, जितक्या भाषिक शाळा असतील त्यात पहिली ते दहावीमध्ये मराठी सक्तीचे करावे. शासनाकडून केवळ इतकेच उपकार करण्यात यावे, बाकी सर्व आम्ही पाहून घेऊ, असे राज ठाकरेंकडून स्पष्ट करण्यात आले. त्या नंतर शासनाच्या निर्णयाची दीपक केसरकर यांच्याकडून माहिती देण्यात आली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!