भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयराजकीय

सर्वात मोठी बातमी;शरद पवार हे विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार?

Monday To Monday NewsNetwork।

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)। निवडणूक रननीतीकार प्रशांत किशोर यांनी काल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी ही उपस्थित होत्या. प्रशांत किशोर यांची गांधी कुटुंबियासोबत एक बैठक झाली. दरम्यान आता या बैठकीसंदर्भातील एक नवीन बातमी समोर आली आहे.या बैठकीत राज्यातील निवडणुकाच नव्हे तर आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांवरही चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यावेळी उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावावर जोर असल्याचं समजतंय.

महत्त्वाचं म्हणजे काही दिवसांपूर्वीच प्रशांत किशोर यांनी दोन वेळा शरद पवारांची भेट घेतली होती. मंगळवारी किशोर यांनी राजधानी दिल्लीतील खासदार निवासस्थानी सोनिया गांधी , राहुल गांधी, प्रियंका गांधी वड्रा यांची भेट घेतली. ही भेट पंजाब कॉंग्रेस किंवा आगामी विधानसभा निवडणुकांमधील सुरू असलेला कलह दूर करण्यासाठी करण्यात आली होती, असं सुरुवातीला बोललं जात होतं. दरम्यान कॉंग्रेसनं 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू केली असून त्यासाठी ही बैठक केल्याचंही म्हटलं जात होतं.
2017 च्या उत्तर प्रदेश निवडणुकीत कॉंग्रेस अपयशी ठरल्यानंतर पाच वर्षांनी राहुल गांधी आणि किशोर यांची भेट झाली. त्यावेळी समाजवादी पक्षाबरोबर युती करुन यूपी विधानसभा निवडणूक लढविणारी कॉंग्रेस अपयशी ठरली होती आणि पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले. यूपी के लडको असा नारा काँग्रेसकडून फेल ठरला होता.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!