भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयक्राईम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीटर अकाउंट हॅक करून
बिटकॉइन संदर्भात मजकूर

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नवी दिल्ली,वृत्तसंस्था। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्वीटर अकाउंटवर लक्ष्य करण्यात आले आहे. अकाउंट हॅक केल्यानंतर बिटकॉइनला अधिकृतपणे कायदेशीर मान्यता देण्याबाबतची ट्विटवर घोषणा करण्यात आली. पंतप्रधान मोदी यांचे ट्वीटर अकाउंट १२ डिसेंबर रोजी सकाळी दोन वाजण्याच्या सुमारास हॅक करण्यात आले होते. त्यानंतर तात्काळ हे अकाऊंट पूर्ववत करण्यात आलं आहे, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.

अल्प कालावधीसाठी हे अकाऊंट हॅक करण्यात आलं होतं. या वेळात अकाऊंटवरून जे ट्वीट करण्यात आलं त्याकडे दुर्लक्ष करावं असं पंतप्रधान कार्यालयाने म्हटलं आहे. अकाऊंट हॅक करण्यात आल्यानंतर रात्री २.११ ते २.१५ या कालावधीत या अकाऊंटवरून बिटकॉईन संदर्भात ट्वीट करण्यात आलं. भारताने बिटकॉईनला कायदेशीर चलन म्हणून स्वीकारलं आहे असं या ट्वीटमध्ये म्हटलं होतं. सरकार अधिकृत पातळीवर ५०० बिटकॉईनची खरेदी करेल आणि नागरिकांमध्ये ते वितरित करण्यात येईल असं या ट्वीटमध्ये म्हटलं होतं. या ट्वीटमध्ये कथित घोटाळ्याची लिंकही देण्यात आली होती.

अकाऊंट हॅक झाल्याचं समजताच कार्यवाही करण्यात आली. थोड्या वेळात हे ट्वीट डिलिट करण्यात आलं. मात्र सोशल मीडियावर याचा स्क्रीनशॉट तसंच #hacked व्हायरल होतो आहे. अकाऊंट हॅक करण्यात आल्यानंतरचं ट्वीटही डिलिट करण्यात आलं आहे. रविवारी सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर राजकीय नेते, भाजप समर्थक यांनी ट्वीटरकडे विचारणा केली. पंतप्रधानांचं अकाऊंटच हॅक झाल्याने सायबर सेक्युरिटीचा मुद्दा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. अकाऊंट हॅक करण्यामागे कोण व्यक्ती किंवा संघटना आहे याची माहिती देण्यात आलेली नाही.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!