ब्रिटन आणि यूएसए मध्ये एवाय.4.2 हा नवा व्हेरियंट; भारतातही हायअलर्ट
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नविदिल्ली, वृत्तसंस्था। गेल्या काही दिवसांमध्ये ब्रिटन आणि यूएसए देशांमध्ये ‘ सार्स कोव्ही 2’ नावाचा डेल्टा व्हेरिएंटचा धोकादायक उपप्रकार सापडल्यानंतर आता नव्याने एवाय.4.2 असे या व्हेरियंट सापडल्याने चिंता व्यक्त होतं आहे.
काळजी म्हणून भारतात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.(AY.4.2 New variant) .शास्त्रज्ञांनी या आधीच असं सूचित केलं आहे की, व्हायरसचा हा नवीन प्रकार डेल्टा स्ट्रेनपेक्षा अधिक संक्रमणीय असू शकतो. प्राप्त माहिती नुसार ब्रिटनमध्ये तब्बल 223 जणांचा मृत्यू झाले झाले आहे,जे या वर्षी मार्चनंतरचे सर्वाधिक आकडे आहेत. आतापर्यंत तरी हा नवीन ‘व्हेरियंट’ भारतात सापडला नाही मात्र सतर्कता बाळगली जात आहे.