भारतात अखेर कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या विषाणूचा शिरकाव,” येथे ” सापडले दोन रुग्ण
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नवी दिल्ली, वृत्तसंस्था। दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या ओमायक्रॉन या विषाणूने जगभरातील अनेक देशांमध्ये धुमाकूळ घातला आहे. या विषाणूचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक 15 डिसेंबरपर्यंत बंद केली होती. पण अखेर ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट आता घडली आहे. भारतात कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या विषाणूने शिरकाव केला आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत घेत कर्नाटकमध्ये ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळल्याचे सांगितले असून आत्तापर्यंत एकूण २९ देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याचे देखील सांगितले. त्यामुळे ओमायक्रॉन आता हळूहळू हातपाय पसरायला लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. या सापडलेल्या रुग्णांमधील एक रुग्ण हा 64 वर्षाचा आहे. तर दुसरा रुग्ण हा 44 वर्षांचा आहे. विशेष म्हणजे दोन्ही रुग्ण हे पुरुष आहेत आणि चाळीस वर्षाच्या पुढे आहेत. या दोन्ही रुग्णांना सौम्य लक्षणे दिसून आली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नव्हती. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल रात्री या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
देशात केरळ आणि महाराष्ट्र ही दोन राज्ये आहे की, ज्यात १० हजारहून अधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहे. देशात ५५ टक्के रुग्ण या दोन राज्यांमध्ये नोंदवली गेली आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. देशात दोन डोस घेतलेल्यांची संख्या वाढली आहे. देशभरात लसीकरणाची संख्या वाढवण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत.