भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयक्राईम

लहान मुलांच्या ऑनलाईन लैंगिक शोषण; सीबीआयचे महाराष्ट्रासह 14 राज्यांमध्ये सर्च ऑपरेशन

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नवी दिल्ली,वृत्तसंस्था। लहान मुलांच्या ऑनलाईन लैंगिक शोषण यांचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले असून त्या अनुषंगाने सीबीआयने महाराष्ट्रासह 14 राज्यांमध्ये सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.

दिल्लीमध्ये 83 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अन्य राज्यांमध्ये सीबीआयचे अधिकारी जे सर्च ऑपरेशन करत आहेत. या सर्च ऑपरेशनमधून मिळालेल्या माहितीच्या आधार पुढील कारवाई करण्यात येणार आहे. ज्या 14 राज्यांमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे, त्यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, ओरिसा, दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश यांच्यासह केंद्रशासित प्रदेशांचाही समावेश आहे.

14 नोव्हेंबरला हे सर्च ऑपरेशन सुरू झाले असून लहान मुलांच्या लैंगिक शोषणाविषयी अनेक धक्कादायक बाबी यातून समोर येणे शक्य आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी या सर्च ऑपरेशन बाबतचे अन्य तपशील जाहीर केलेले नाहीत. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीत केलेल्या कारवाईत 83 जणांविरुद्ध 23 केसेस दाखल केल्याचे समजते. लहान मुलांच्या ऑनलाइन लैंगिक शोषणा विरोधात सीबीआयने आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे मानले जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!