भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीय

तालिबानचा भारतासाठी मैत्रीचा पैगाम, पण भारत- पाकिस्तान वादात भाग घेणार नाही

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नविदिल्ली(वृत्तसंस्था)। तालिबानने अफगाणिस्तानवर वर्चस्व मिळवलं आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी काल, रविवारी देश सोडून गेले. सध्या अफगाणिस्तानमध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. यादरम्यान तालिबान भारतासोबत मैत्री करू इच्छित असल्याचे समोर आले आहे. तसेच जरी मैत्री केली तरी भारत-पाकिस्तान वादात तालिबान भाग घेणार नाही असे जाहीर केले आहे, याबाबतची माहिती तालिबान प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी दिली आहे.

तालिबान प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद म्हणाले की, ‘आम्ही भारतासोबत चांगली आणि मजबूत संबंध बनवू इच्छित आहोत. सर्व मुत्सद्दी येथे सुरक्षित राहतील. कोणालाही देश सोडून जाण्याची गरज नाही आहे.’ एकीकडे तालिबान भारतासोबत मैत्रीचे नाते करण्यास तयार असताना दुसरीकडे भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षामध्ये हस्तक्षेप करू इच्छित नसल्याचे स्पष्ट केले आहे. दोन्ही देशांच्या परस्परातील वाद असून यामध्ये तालिबान कोणतीही भूमिका बजावणार नाही.

दरम्यान शेजारील देश असल्यामुळे भारत नेहमी अफगाणिस्तानमधील लोकशाही बळकट करण्यासाठी आणि अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्यात महत्त्वाचे योगदान करू शकतो. परंतु तालिबानने सातत्याने याचा विरोध केला आहे. यामुळे जेव्हा तालिबानने भारतसोबत चांगल्या नात्याबद्दल बोलतो, तेव्हा त्याच्या हेतूबद्दल अनेक प्रश्न निर्माण केले जातात.

माध्यमांसोबत बातचित करताना तालिबानने अफगाणिस्तानमध्ये भविष्यात विस्तार करणार असल्याचे म्हटले आहे. तालिबान राज्यामध्ये महिलांना शिकण्यास संधी दिली जाईल. त्या बाहेर जाऊ काम करू शकतील. फक्त अट एकच आहे की, सर्व महिलांना शरीया कायद्याचे पालन करावे लागले आणि त्यांना बुर्खा घालणे आवश्यक आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!