सुप्रीम कोर्टाने लैंगिक अत्याचारा बाबत “हा” दिला महत्वपूर्ण निर्णय
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नवी दिल्ली,वृत्तसंस्था। सुप्रीम कोर्टाने लैंगिक अत्याचाराच्या एका प्रकरणात मुंबई हायकोर्टाला झटका दिला असून सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाचा निर्णय फेटाळत एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने लैंगिक छळाच्या एका आरोपीची निर्दोष मुक्तता केली होती. शरीराला संपर्काशिवाय अल्पवयीन मुलाचे खाजगी अवयव पकडणे पॉक्सो कायद्यांतर्गत येत नाही, या आधारावर ही मुक्तता करण्यात आली होती. अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात हा मुद्दा उपस्थित केला. पण हाच निर्णय सु्प्रीम कोर्टाने फेटाळत लैंगिक छळाच्या प्रकरणात पीडितेला स्पर्श जरी नाही केला तरी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो, असा निर्णय जाहीर केला आहे.
दरम्यान सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, लैंगिक हेतूने शरीराच्या लैंगिक भागाला स्पर्श करणे हे पॉक्सो कायद्याचे प्रकरण आहे. कपड्यांवरून मुलाला स्पर्श करणे म्हणजे लैंगिक अत्याचार नाही असे म्हणता येणार नाही. अशा व्याख्येमुळे मुलांचे शोषण होण्यापासून संरक्षण करण्याच्या कायद्याचा उद्देशच नष्ट होईल. तसेच या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवत ३ वर्षांची शिक्षा सुनावली आहे