भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयआरोग्य

थांबा थांबा, घाई करू नका बरं!हे धोकादायक ठरू शकतं! कोरोनाच्या मोठ्या धोक्याबाबत WHO ने भारताला केलं सावध

Monday To Monday NewsNetwork।

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)। एकिकडे देशात कोरोनाची दुसरी लाटही नियंत्रणात येताना दिसते आहे. कोरोनाची प्रकरणं मोठ्या प्रमाणात कमी झाली आहेत. लसीकरणाचा वेग वाढवला जातो आहे. अशात देशातील कोरोना प्रतिबंध हटवण्याचा विचार सुरू आहे. काही राज्यांनी कोरोना प्रतिबंध शिथील केले आहेत. तर काही राज्य तशा तयारीत आहेत. याचदरम्यान आता जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) भारताला कोरोनाच्या मोठ्या धोक्यापासून सावध केलं आहे.

कोरोना प्रतिबंध हटवण्याची घाई करू नका, हे धोकादायक ठरू शकतं, असं डब्ल्यूएचओने भारताला म्हटलं आहे. भारतातील डेल्टा  व्हेरिएंटसह इतर चिंताजनक व्हेरिएंट्सचं वाढतं संक्रमण पाहता कोरोना प्रतिबंध हटवणं खतरनाक ठरू शकतं. ज्या लोकांना अद्याप कोरोना लस घेतली नाही आहे, त्यांना कोरोना नियमांपासून शिथिलता देणं धोकादायक ठरू शकतं, असं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रॉस अधानोम घेब्रेयासस  यांनी सांगितलं आहे.

भारतात ऑक्टोबर 2020 मध्ये आढळलेल्या B.1.617.2 व्हेरियंटला डेल्टा व्हेरियंट म्हटलं गेलं आहे. तर, दुसऱ्या B.1.617.1 स्ट्रेनचं नामकरण कप्पा (Kappa) असं केलं गेलं आहे. यातील डेल्टा व्हेरियंटचे एक विषाणू स्वरूपच (स्ट्रेन) फक्त घातक असून इतर दोन प्रकारांचा धोका कमी झाला असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने याआधी सांगितलं होतं. हा स्ट्रेन भारतात सर्वात आधी दिसून आला होता.

व्हायरसच्या B.1.617  व्हेरिएंटला ट्रिपल म्युटेंट व्हेरिएंट म्हणण्यात आलं होतं. संयुक्त राष्ट्राच्या आरोग्य संस्थेने गेल्या महिन्यात संपूर्ण स्ट्रेनला व्हीओसी म्हणजे व्हेरिएंट ऑफ कन्सर्न घोषित केलं होतं.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!