लसीकरण मोहिम थंडावल्यास देशात कोरोनाची तिसरी लाट येणार,आरोग्य तज्ज्ञांचा इशारा
Monday To Monday NewsNetwork।
नविदिल्ली(वृत्तसंस्था)।देशात कोरोनाची दुसरी लाट सध्या ओसरत असून अनेक राज्यांमधील कोरोनाबाधितांचा रिकव्हरी रेटही वाढत आहे. परंतु लसींच्या तुटवड्यामुळे देशात कोरोनाविरोधी लसीकरण मोहिमेला ब्रेक लागला आहे. त्यामुळे दिल्ली, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये लसींचा तुटवडा जाणवत आहे. यात दिल्लीतील अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये लसींचा तुटवडा असून मात्र खासगी रुग्णालयांमध्ये मुबलक प्रमाणात लस उपलब्ध आहेत. परंतु लसींची परिस्थिती भविष्यात अशीच राहिल्यास देशात कोरोनाची तिसरी लाटेचा अधिक धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.
यावर डॉ. युद्धवीर सिंग यांनी सांगितले की, दिल्लीत जर कोरोनाविरोधी लसीकरणाची अशीच स्थिती राहिल्यास कोरोनाची तिसरी केव्हाही आपले रौद्र रुप धारण करु शकते, दिल्लीस फार कमी नागरिकांना लसींचे दोन्ही डोस मिळाले आहेत, त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवत खासगी लसीकरण केंद्रांवर लसींचे दर निश्चित केले पाहिजे. तसेच अधिकाधिक नागरिकांपर्यंत लस पोहचवली पाहिजे.
त्याचप्रमाणे ड्रायव्ह थ्रू व्हॅक्सिनेशनबाबत सरकारने विचार करण्याची गरज आहे. कारण यामुळे ऑब्झर्वेशन प्रक्रिया समाप्त झाली आहे. लसीकरणानंतर अर्धा तास डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली राहणे आवश्यक आहे, मात्र ड्रायव्ह थ्रू व्हॅक्सिनेशनमध्ये असे होत नाही, त्यामुळे लसीची कोल्ड चेनमध्ये सुरळीत ठेवण्यातही अडथळे येतायतं. त्यामुळे केंद्राने ड्रायव्ह थ्रू व्हॅक्सिनेश पुन्हा सुरु केले पाहिजे. असेही डॉ. युद्धवीर सिंग म्हणाले.