भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यराष्ट्रीय

संसर्ग झालेल्या व्यक्तीचा खोकला,शिंक किंवा जमिनीवर पडलेल्या थुंकीतून निघणाऱ्या कणांपासूनही कोरोनाचा संसर्ग

Monday To Monday NewsNetwork।

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)। कोरोनाच्या भारतात दुसऱ्या लाटेत रुग्णाच्या संख्येत चांगलीच वाढ झाली ,मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तर कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येसह मृतांची आकडेवारीसुद्धा झपाट्याने वाढली होती. परन्तु आता हळू हळू रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी देशात लसीकरण मोहिमसुद्धा सुरु आहे.तसंच काही राज्यांनी कडक लॉकडाऊन केलं . त्यातच आता केंद्र सरकारने कोरोनापासून वाचण्यासाठी मास्क सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझर यांच्याबाबत नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत.

केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार के विजय राघवन यांच्या कार्यालयाने नवी नियमावली प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार, खोकला आणि शिंक यामुळे व्हायरस दहा मीटरपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे अधिक काळजी घ्यावी लागेल असं म्हटलं आहे. कोरोनाबाबत नव्या गाइडलाइननुसार, कोणत्याही संसर्ग झालेल्या व्यक्तीचा खोकला किंवा शिंक यामुळे व्हायरस पसरण्याचा मोठा धोका असतो. अशा रुग्णाच्या ड्रॉपलेटमधून शिंक किंवा खोकल्यानंतर नाक, तोंडातून बाहेर फेकले जाणारे थेंब 10 मीटरपर्यंत विषाणू हवेत जाऊ शकतो.या साठी मास्क घालणं गरजेचं असून सोशल डिस्टन्सिंगचं पालनही करणं कोरोनापासून वाचण्यासाठी आवश्यक आहे. लक्षणं दिसत नसलेल्या रुग्णांपासूनही कोरोना पसरू शकतो. याशिवाय शिंकल्यानंतर किंवा खोकल्यानंतर जमिनीवर पडलेल्या थुंकीतून निघणाऱ्या कणांपासूनही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो असं केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार के विजय राघवन यांच्या कार्यालयाने नवी नियमावली प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार अस गाइडलाइन्स मध्ये म्हटलं आहे.तसेच देशातील अनेक राज्यांमध्ये रस्त्यावर थुंकल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.असंही म्हटल आहे.

सरकारी पॅनेलने हाय कॉन्टॅक्ट पॉइंट्सची नियमित आणि सातत्याने स्वच्छता करण्यास सांगितलं आहे. यामध्ये दरवाजाचे हँडर्स, लाइट स्विच, टेबल, खुर्च्या यांचा समावेश आहे. तसंच ब्लिच किंवा फिनाइल याने स्वच्छ करा असंही सांगण्यात आलं आहे. लोकांनी कोरोनापासून वाचण्यासाठी डबल मास्क किंवा N95 मास्क घालावा. जर कॉटनच्या कपड्याचा मास्क असेल तर दोन मास्क घालायला हवेत. सर्जिकल मास्क असल्यास एकच मास्क चालेल.नव्या गाइडलाइननुसार, सर्जिकल मास्क असल्यास त्याचा एकदाच वापर करता येईल. मात्र डबल मास्क असेल तर तुम्ही पाच वेळा वापरू शकता. इतकंच नाही तर व्हेंटिलेशन असलेल्या ठिकाणी कोरोना पसरण्याचा धोका कमी आहे. त्यामुळे घरी आणि कामाच्या ठिकाणी व्हेंटिलेशन चांगलं असायला हवं. त्यामुळे तुम्हाला कोरोनाचा धोका कमी असेल.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!