IIT दिल्लीचा तिसऱ्या लाटे बाबत गंभीर इशारा; दुसऱ्या लाटे पेक्षाही ६० टक्के अधिक रुग्णवाढीचे संकेत
Monday To Monday NewsNetwork।
नवी दिल्ली(वृत्तसंस्था)। आयआयटी दिल्लीने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, कोरोनाच्या सर्वात वाईट काळाचा सामना करण्याची तयारी ठेवा. तिसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या दररोज ४५ हजारतच्या वर जाण्याची शक्यता आहे. त्यातील दररोज ९ हजाराहून अधिक रुग्णांना रुग्णालयात भरती होण्याची गरज असेल. हा रिपोर्ट कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत दिल्ली उच्च न्यायालयात जमा करण्यात आला आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे ९४४ मॅट्रीक टन ऑक्सीजनची दररोज आवश्यकता असणार आहे. न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले आहे की, या रिपोर्टच्या अनुसार सरकारने आवश्यक ती पावलं उचलावी. शतकातून एकदा येणाऱ्या महामारीशी आपण मुकाबला करीत आहोत. शेवटची महामारी १९२० मध्ये आली होती. येणाऱ्या कोरोना लाटेचा मुकाबला करण्यासाटी ऑक्सीजनची निर्मिती प्राध्यान्याने वाढवणं गरजेच असणार आहे.
दुसऱ्या लाटेहून ६० टक्के अधिक रुग्णसंख्या
आयआयटी दिल्लीच्या रिपोर्टमध्ये ३ परिस्थितींबाबत उल्लेख केला आहे. त्यानुसार सरकारी आरोग्य सुविधा वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करणं गरजेचं आहे. १ रुग्णांची संख्या, ऑक्सीजनच्या गरजेचं अनुमान
२ नवीन रुग्णसंख्येच्या प्रमाणात सुविधा वाढवण्याचे आव्हान
३ रुग्णांच्या संख्येत ६० टक्के अधिक वाढ