सोशल मीडियावर व्हायरल झालेले निवडणूक आयोगाच्या सूचनांचे ” ते” पत्र बनावट
नवी दिल्ली,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l निवडणूक आयोगाची एक अधिसूचना सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसली, पीआयबी फॅक्टने निवडणूक आयोगाच्या सूचनांचे “ते” पत्र बनावट असल्याचे म्हटले आहे, माजी आयुक्त अरुण गोयल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर निवडणुकीचे आयुक्तपद रिकामे होते. यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने दोन निवडणूक आयुक्तांची निवड केली. माजी सनदी अधिकारी ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र या दोन्ही नावांची घोषणा होण्याआधीच निवडणूक आयोगाची एक अधिसूचना सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसली. ज्यात डॉ. राजेश कुमार गुप्ता आणि डॉ. प्रियांश शर्मा या दोन नवीन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती झाल्याची माहिती होती. दोन्ही अधिकारी 13 मार्च 2024 रोजी पदभार स्वीकारतील असेही लिहिले होते.
माजी आयुक्त अरुण गोयल यांनी 9 मार्च रोजी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर 3 सदस्यीय निवडणूक आयोगात फक्त सीईसी राजीव कुमार उरले होते. यापूर्वी अनुप पांडे हे 15 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयुक्त पदावरून निवृत्त झाले होते. त्यामुळे निवडणूक आयुक्तांची दोन पदे रिक्त होती. 14 मार्च रोजी म्हणजे आज पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील समिती दोन आयुक्तांच्या नावाची घोषणा करणार होती. मात्र त्याआधीच निवडणूक आयोगाची अधिसूचना व्हायरल झाली. मात्र पीआयबी फॅक्ट चेकने व्हायरल पत्राचे खंडन केले आहे.
पीआयबी फॅक्टने निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पत्र बनावट असल्याचे म्हटले आहे. पोस्ट शेअर करताना पीआयबीने लिहिले की, भारतीय निवडणूक आयोगामध्ये दोन निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित एक अधिसूचना सोशल मीडियावर शेअर करताना म्हटले की, ही अधिसूचना बनावट आहे. अशी कोणतीही राजपत्र अधिसूचना जारी केलेली नाही.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने निवडणूक आयुक्तांच्या रिक्त जागेवर माजी सनदी अधिकारी ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू यांची आज नेमणूक केली आहे. काँग्रेसचे नेते, खासदार अधीर रंजन चौधरी हे तप्रधानांच्या समितीमधील एकमेव विरोधी पक्षातील नेते आहेत. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, समितीसमोर उत्पल कुमार सिंह, प्रदीप कुमार त्रिपाठी, इंदभर पांडे, सुखबीर संधू, सुधीर कुमार आणि गंगाधर रहाटे यांची नावे होती. त्यातून आम्ही ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू यांची निवड केली.